Social work: भगिनी निवेदिता ग्रुप तर्फे आदिवासी भागातील महिलांना साड्या वाटप



भारतीय अलंकार

अकोला: श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा मंडळ अंतर्गत भगिनी निवेदिता ग्रुप हा अकोला शहर व परिसरातील वंचित घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे सेवाकार्य करत आहे. मग ते कार्य शैक्षणिक सामाजिक अथवा किंवा निराधार कोणत्याही घटकांसाठी असो कार्य करत राहणे व सामाजिक हित जपणे हा जणू ग्रुपचा ध्यासच आहे. त्यामधील हा एक उपक्रम आहे.




अकोला पासून ३० किलोमीटर असलेल्या व २४८ घरांची लोकवस्ती असलेल्या आदिवासी भागा मधील खडका या ठिकाणी गरजू स्त्रियांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी मोलाचे सहकार्य लाभले ते अहमदनगर येथील कल्याणी पंडीत यांचे.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजय सोळंके यांनी करून कार्यक्रमाचा उद्देश्य विषद केला. त्यानंतर भगिनी निवेदिता ग्रुपच्या प्रमुख उषा देशमुख यांनी उपस्थित महिलांना साडी,फराळ देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा केंद्र अकोला जिल्हा समन्वयक पूजा गुंटीवार यांनी केले.



कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. विद्या राऊत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. गृप सदस्या अपर्णा अपूर्वा,  अर्चना मुंदडा आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या