- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Shivsena Akola: दानवे यांचे बेताल विधान आणि पेट्रोल,डिझेल,गॅस सिलेंडर दरवाढ निषेधार्थ 'निषेध यात्रा'
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला: दिल्ली- हरियाणा सीमेवर आंदोलन बाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी "शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन-पाकिस्तानचा हात आहे", असे वादग्रस्त विधान केले होते. या विरोधात शनिवारी राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून अकोल्यात देखील शिवसेना पक्षाकडून 'निषेध यात्रा' आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अकोला जिल्हा शिवसेनेने गँस सिलेंडर दरवाढ, डिझेल व पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलना बाबत केलेले बेताल वक्तव्यचा निषेध करण्यात आला.
जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख यांचे नेतृत्वात गोपाल दातकर,विकास पागृत, राजेश मिश्रा,मंगेश काळे,गजानन चव्हाण,तरुण बागेरे आदींच्या मार्गदर्शनात सिव्हील लाईन ते मदनलाल धिंग्रा चौकापर्यंत शिवसैनिकांनी निषेध यात्रा काढली.
या निषेध यात्रेत गर्दभच्या चेहऱ्यावर दानवे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांचा मुखवटा चढविण्यात आला होता. तर बैलगाडीत मोटर बाईक आणि रिकामे गँस सिलेंडर ठेवले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा