- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Sanjay Raut: आ देखे जरा किसमे कितना है दम... संजय राऊत यांनी नोंदवली पहिली प्रतिक्रिया; वर्षा राऊत यांना ईडी कडून समन्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार
मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी हा समन्स देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या समन्स द्वारा मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आला आहे. याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आता मात्र त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत अथवा वर्षा राऊत यांच्या कडून याबाबत सायंकाळ पर्यंत कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. परंतू सायंकाळी संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करून प्रतिक्रिया नोंदवली.
ईडीकडून समन्स आल्यावर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
photo ट्विटर
संजय राऊत यांनी आपल्या शैलीत एक ट्विट करत म्हटले, "आ देखे जरा किसमे कितना है दम जमके रखना कदम मेरे साथीया" असं हिंदीमध्ये ट्विट केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा