- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
बुलडाणा-नांदूरा: राष्ट्रीय महामार्गावरील आंबोडा फाट्या नजीक ट्रक व रुग्णवाहिकेत आमने सामने झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयाची रुग्णवाहिका नागपूरला रुग्ण सोडून परतत असतांना आंबोडा फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचे चालक गजानन राजेंद्र पाटील वय २५ वर्षे रा लालबाग, बऱ्हाणपूर हे जागीच ठार झाले. तर रवींद्रसिंह बहाद्दरसिंह ठाकूर वय २४ रा वडनेर जोहरी, तालुका आस्था, जिल्हा सिहोर (म. प्र. ) हे गंभीररित्या जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच १०८ चे डॉ शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमीला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ जैस्वाल, डॉ बेंडे यांनी तातडीने उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने जखमीला अधिक उपचाराकरीता मलकापूर येथे हलविण्यात आले. यावेळी प्रवीण डवंगे, शिवा घाटे, सोहेल भाई यांनी मदतकार्य केले. घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा