- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला: बोरगाव मंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या काटेपूर्णा नजीक आज पहाटे घडलेल्या एका अपघातात कोळसा घेऊन चंद्रपूर कडून मुंबईकडे निघालेला ट्रक क्रमांक MH 4B AG 1465 हा काटेपूर्णा नदीवरील पुलावरुन खाली पडला. यात चालकाचा ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला.पहाटेचे धुके आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव मंजू पो.स्टे. हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील काटेपूर्णा गावा जवळील काटेपूर्णा नदी वरील पुलावरून पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन चंद्रपूर कडून मुंबईकडे जात असलेला ट्रक क्रमांक MH 4B AG 1465 चालक साहेब खा युसुफ खा रा.पालघर, मुंबई हा औरंगजेब खा हलील खा याचे सोबत जात असताना ट्रक पुलाखाली कोसळला. यामध्ये चालक साहेब खा युसुफ खा हा ट्रक खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या औरंगजेब खा हलील खा याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्यासह हे.कॉ.दीपक कानडे, पो.कॉ. योगेश काटकर आदींनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा