Road accident: विशेष मोहिमे अंतर्गत अकोला शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; 2685 वाहन धारकांकडून दंड वसूल




भारतीय अलंकार

अकोला: वाहतुकीच्या नियमांचा भंग करून बेदरकारपणे वाहन चालविणे व इतर भौगोलिक कारणाने रस्ते अपघात होऊन हकनाक लोक मृत्यूमुखी पडतात. जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघात कमी व्हावे, यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे दीड महिन्या पासून जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी वाहतूक पोलीस अंमलदार सह वाहन चालकांवर धडक कारवाई करून आज पर्यंत एकूण 2685 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून जवळपास 15 लाख रुपयांचे वर दंड वसूल केला आहे.




दंडात्मक कारवाई 


यामध्ये  मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणारे एकूण 470,  धोकादायक रित्या वाहन चालविणाऱ्या 30, मद्य प्राशन करून वाहन चालविणारे 4, चुकीच्या मार्गावरून वाहन दामटणारे 66, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणारे 580, सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणारे 1190,  वाहन चालविताना मोबाईल वर बोलणाऱ्या 280 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 



ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन शेळके व उपनिरीक्षक सुरेश वाघ व वाहतूक पोलीस अंमलदार यांनी राबविली.



रस्त्यावरील प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी मोटर वाहन कायद्याचे पालन करीत अपघात टाळण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.


हे सुध्दा वाचा:मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरघाव वाहनाने चिरडले; ३ ठार,१ गंभीर जखमी

टिप्पण्या