Road accident: मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना भरघाव वाहनाने चिरडले; ३ ठार,१ गंभीर जखमी




भारतीय अलंकार

अकोला : मॉर्निंग वॉक करीत असलेल्या नागरिकांना भरघाव वाहनाने धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला असून, एक गंभीर जखमी आहे. चौघांना टेम्पोने  धडक दिल्याची ही दुर्दैवी घटना आज पहाटे अकोला जिल्ह्यातील अकोट - अंजनगाव राज्य महामार्गावर घडली.


या घटनेत एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघांचा मृत्यू रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना झाला. एक गंभीर जखमी व अन्य एक किरकोळ जखमी यांच्यावर उपचार सुरू आहेत. शालीग्राम राऊत, गजानन नेमाडे, उत्तम नाठे असे मृतकांचे नाव आहे. तिघेही अकोट येथील रहिवासी आहेत. या अपघातात अनंत बोराडे हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे अकोटात शोककळा पसरली आहे.



अकोट तालुक्यातील अकोट - अंजनगाव राज्य महामार्गावर परिसरातील नागरिक  पहाटे फिरायला जात असतात. एखादे वाहन आले की, नागरिक कडेला होतात. मात्र, आज वाहन  क्रमांक MH 20 DE 7433 भरघाव व निष्कळजीने येवून नागरिकांना धडक दिली. प्रसंगवधान राखल्याने यात अनेक नागरिकांचे प्राण वाचले. मात्र, दुर्दैवाने या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला. धडक दिल्यानंतर वाहन जागीच पलटी झाला. वाहन चालकावर भारतीय दंड विधान व मोटार वाहन अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाहन ताब्यात घेवून चालकास अटक केली. घटनेचा अधिक तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.



टिप्पण्या