Ramesh Mhaisne: सहकारनेते रमेश म्हैसने यांचे निधन




भारतीय अलंकार

अकोला: सहकार नेते माजी जि. प. सदस्य रमेश मामा म्हैसने यांचे आज निधन झाले.



चोहट्टा बाजार जवळ दोन टाकळी नावाचे गावं आहेत. त्यातील एक म्हैसनेची टाकळी या नावानं ओळखल्या जाते. वै.रमेश मामा त्याच टाकळीचे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले रमेश मामा स्वतः उच्चशिक्षित होते. वडील वै.पंढरीनाथ म्हैसने वारकरी संप्रादायाचे होते. पंढरीच्या पांडूरगांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या म्हैसने परीवाराची आज ही पंढरीची वारी त्यांच्या परीवारात कित्तेक पिढ्यांपासून चालू आहे.



पंढरपूरात आषाढी, कार्तिकेच्या वारीला नियमित जात असल्यामुळे त्यांनी त्याकाळी पंढरपूरात राहण्यासाठी स्वतः  मठ उभारले. काही वर्षापासून आळंदीला सुध्दा मठाचे काम जन सहयोगातून रमेश म्हैसने यांच्या मार्गदर्शनात चालू होते.



मूळात गर्भश्रीमंत आणि जवळपास शंभर एकराच्यावर शेती असलेल्या मामांना अजिबात अंहकार नव्हता.



सहकार क्षेत्रात त्याचे विशेष वर्चस्व होते. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशा वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी समाज सेवा केली. 


टिप्पण्या