- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विजय देशमुख यांची आज बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी अकोला महानगर अध्यक्षपदी नियुक्तीपत्र देत नियुक्ती केली.आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवत त्याचप्रमाणे पक्ष संघटन महानगरात आणखीन मजबूत करण्याच्या उद्दिष्टाने त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे .
ही नियुक्ती मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात बैठकीमध्ये करण्यात आली. यावेळी नगरसेवक नितीन झापर्डे , नगरसेवक रहीम पेंटर,मनोज गायकवाड , रफिक सिद्दीकी , फजलु पहेलवान , फैय्याज खान आदी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी याआधी भूषविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा