Patil samaj:घाटोळे पाटील समाज विकास मंडळाची वास्तू लवकरच राहणार उभी- भुषण मापारी



भारतीय अलंकार

अकोला: महानगरात खडकीतील जिल्हा परिषद नगर परिसरात मराठा घाटोळे पाटिल समाजाच्या मंगल भवन व समाजातील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी,  यादृष्टीने बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाची वास्तू लवकरच निर्माण अवस्थेत पोहोचणार आहे. मराठा घाटोळे पाटिल समाज विकास मंडळाच्या माध्यमातून साकारण्यात येत असणाऱ्या या भव्य वास्तूचा फलक अनावरण सोहळा नियोजित जागेवर रविवारी मोठ्या उत्साहात झाला.



समाजाचे ज्येष्ठ समाजसेवी पांडुरंग गाडवे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या फलक अनावरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भूषण मापारी, डॉ.राम शिंदे, मधुकर ठोकळ, भाऊसाहेब कपले, साहेबराव भांगे,  ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक कोहर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते समाजाच्या मंगल भवन व वसतिगृह नामफलकाचे रीतसर रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.



यावेळी डॉ. मापारी यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करीत समाजाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ती गरज सामूहिक प्रयत्नाने पूर्ण होऊन समाज विकसित होतो.समाजातील सुसंवादासाठी वास्तूची गरज असते. ही गरज या वास्तूच्या निर्मितीच्या रूपाने पूर्ण होऊ शकते. म्हणून समाज बांधवांनी तन मन धनाने या वास्तूच्या निर्मितीत आपले योगदान देण्याचे आवाहन करीत या उपक्रमास आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. 



कार्यक्रमात या नियोजित वास्तुस आर्थिक सहाय्य करणारे माजी आ.विजय जाधव, गणेश शिंदे, प्रशांत बोथे, पुणे येथील गुणवंत गहुले आदींचा शाल श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आला. समाज विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव नानोटे, कार्याध्यक्ष सहदेव शिंदे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कपले, भाऊसाहेब काळे, नारायण बारड, सचिव दिलीप बोबडे, सहसचिव श्रावण फाले, कोषाध्यक्ष सुरेश गाडवे, संघटन सचिव रावसाहेब राहणे समवेत संचालक डॉ. शरद दहातोंडे, डॉ. जगदेव मार्गे, डॉ.विजय लकडे, रुपेश लडे, अरविंद कपले, गणेश नानोटे, सतिष पाटील, पियूष चव्हाण, हरिचंद्र डांगे, डॉ.दयानंद पावसे, महेंद्र गाडवे, मनीष  सरोदे आदीच्या कार्यकाळात ही वास्तू साकारत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण बारड यांनी, संचालन रावसाहेब राहणे यांनी तर आभार डॉ.दयानंद पानसे यांनी मानले. यावेळी सहदेव शिंदे, श्रावण फाले, दिलीप बोबडे, संतोष लांडगे, रामेश्वर हातोलकर, गणेश नानोटे, विजय पिंपळकर, विजय शिंदे ,मनीष खांबलकर, प्रकाश शिंदे, अनंता शिंदे, बंटी काळे, विकास बनसोड, विष्णुदास भालेराव, गोविंद आगे,संदीप आगे, महेन्द्र गाडवे, जगन्नाथ वानखडे, विजय मोरे, चंद्रकांत अवचार समवेत बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या