- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
मुंबई: अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोहीम सुरु केली आहे, हा वाद आता उग्र होण्याचे संकेत आहेत. मनसेने चेतावणी दिल्यानंतर अॅमेझॉन कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली. यामुळे आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ”महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल! ” असं म्हणत मनसेने नोटिसीनंतर गर्भित इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांना आज दिंडोशी न्यायालयाने नोटीस बजावली असून, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या नोटिस नंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याविषयी भूमिका मांडण्यात आली आहे.
ट्विटर वरील ट्विट
व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला.
पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर… महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय ह्याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल!
पार्श्वभूमी
ऑनलाईन शॉपिंग ऍपवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत ऍप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर मुंबईतील वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आदि परिसरात लावण्यात आले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा