- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार
अकोला: कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ. के. व्ही. मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून संगीत विभागाचे प्रा. सुशील वावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. वावरकर यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकाश टाकून उपस्थितांचे मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य, डॉ. के. व्ही. मेहरे यांनी संत गाडगेबाबांनी सांगितलेल्या दशसूत्री प्रमाणे आपण आपले जीवन जगले पाहिजे असे उपस्थितांचे उद्बोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जामनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीत विभागाचे प्रा. सुधाकर मनवर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व रा.से.यो.चे स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी रा.से.यो. च्या वतीने महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा