- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत
भारतीय अलंकार
अकोला: राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी आंदोलनच्या मागण्या मंजूर करून तिन्ही कायदे रद्द करा, या मागणीचे निवेदन आज आप पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत पंतप्रधान यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
केंद्र सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात हे तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत.आतापर्यंत सरकार कडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना, राष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करण्यासाठी येत आहेत.
या मागण्या शेतकरी हिताच्या असून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी ते तिन्ही कायदे मागे घेण्यात यावेत . या कायद्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जोपासले जात नसून, आम आदमी पार्टी अकोला शेतकऱ्यांच्या आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे. त्यामुळे शेतकरी संगटनांच्या प्रतिनिधीं सोबत तातडीने बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत. विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्हे मागे घ्याव्यात, असे निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी अमरावती विभागीय संयोजक शेख अन्सार यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा संयोजक अरविंद कांबळे, अकोला शहर संयोजक डॉ खंडेराव दाभाडे, सचिव गजानन गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा