Election2020: अमरावती विभाग: शिक्षक मतदार संघ: महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

या अनपेक्षित निकालामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे




भारतीय अलंकार

अकोला: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये अपक्ष उमेदवार ऍड. किरण सरनाईक यांनी ३२४२ मतांनी आघाडी घेतली आहे. सरनाईक यांनी पहिल्या फेरी पासून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना पिछाडीवर ठेवण्यात यश मिळविले. 



मिळालेली मते

किरण सरनाईक - १२४३३

श्रीकांत देशपांडे - ९१९१



एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मत मोजणीला सुरुवात करण्यात आली.  उशीरा रात्री अंतिम निकाल हाती येणार,अशी अपेक्षा होती. मात्र, दुसरा दिवस उजाडून शुक्रवारी रात्री निकाल स्पष्ट झाला. 



अनपेक्षित निकाल

भाजपा आणि महाविकास आघाडीची अभेद्य भिंत फोडून अपक्ष उमेदवार सरनाईक यांनी अमरावती विभागाचा अनपेक्षित असा निकाल दिला. या निकालामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलले आहे.



पहिल्या फेरीपासून आघाडी 


सरनाईक यांनी मतमोजणीच्या पहिल्या फिरीपासूनच आघाडी घेतली होती,ती शेवटपर्यंत कायम ठेवली.तर श्रीकांत देशपांडे यांनी दुसरे आणि शेखर भोयर यांनी तिसरे स्थान पहिल्या फेरीपासून कायम ठेवले.




टिप्पण्या