Election: अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम घोषित



भारतीय अलंकार

अकोला:  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. 

यामध्ये अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे.



अकोला जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायती मध्ये निवडणूका होतील. यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ३४, अकोट तालुक्यातील ३८, मुर्तिजापूर तालुक्यातील २९, अकोला तालुक्यातील ३६, बाळापूर तालुक्यातील ३८, बार्शीटाकळी तालुक्यातील  २७,  पातुर तालुक्यातील २३ अशा एकून २२५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. 



निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल  जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अस्तित्वात राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



निवडणूक कार्यक्रम 


तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक: मंगळवार १५ डिसेंबर २०२०.


नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक: बुधवार दि.२३ डिसेंबर ते बुधवार दि.३० डिसेंबर २०२० (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)


नामनिर्देशन पत्रांची छाणनी: गुरुवार दि.३१ डिसेंबर २०२० सकाळी ११ वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत.


नामनिर्देशपत्र मागे घेणे: सोमवार दि.४ जानेवारी २०२१ दुपारी तीन वाजेपर्यंत.


निवडणूक चिन्ह नेमून देणे व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे: सोमवार दि.४ जानेवारी २०२१ दुपारी तीन वाजेनंतर.


मतदानाचा दिनांक: शुक्रवार दि.१५ जानेवारी २०२१ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत. 


मतमोजणी: सोमवार दि.१८ जानेवारी २०२१


निवडणुकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करणे: गुरुवार दि.२१ जानेवारी २०२१.




टिप्पण्या