Crime news: वाढदिवसालाच रिपाई नेता झाला फरार; गजानन कांबळेच्या बर्थ डे पार्टीत झाला राडा

सात आरोपीना अटक, रिपाई नेते गजानन कांबळे, नगरसेवक फिरोज खानसह अन्य आरोपी फरार




 

भारतीय अलंकार

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाशीम बायपास येथे रिपाई नेते गजानन कांबळे यांच्या वाढदिवस कार्यक्रमात शनिवारी रात्री अचानक राडा झाला. याप्रकरणी आता पर्यंत पोलिसांनी ७ आरोपींना अटक केली आहे.तर गजानन कांबळे,नगरसेवक फिरोज खान यांच्या सह अन्य आरोपी फरार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.



 

सविस्तर हकीगत अशी की,जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या वाशीम बायपास रोडवर एका हॉटेल मध्ये कांबळे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने लावण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही वेळा करिता वाहतूक ठप्प झाली होती. त्यावेळी वाशिमहुन अकोला येथे एस टी बस येत असताना, वाढदिवसात उपस्थित मंडळींनी चक्क एसटी बस वर हल्ला चढवित बसच्या काचा फोडल्याची घटना घडली. वाढदिवस पार्टीत धक्का लागल्या वरून सुरुवातीला वाद झाला असून नंतर तो वाद इतक्या विकोपाला गेला की त्या वादाचे पडसाद बाहेर उमटले. त्यातूनच बस व xuv गाडीची काचा फोडल्याची घटना घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



घटनेचे गांभीर्य बघता घटना स्थळी जुने शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा पोहोचले होते . या प्रकरणी रिपाई नेते गजानन कांबळे, नगरसेवक फिरोज खान युवराज भागवत यांच्या सह सुमारे वीस ते पंचवीस आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. सात आरोपी अटक असल्याची माहिती जुने शहर पोलिसांनी दिली. या प्रकरणी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.





याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी गजानन कांबळे , फिरोज खान , युवराज भागवत याच्यासह अन्य आरोपीं विरुद्ध भांदवि कलम 353 , 143 , 147 , 149 , 427 ,  यांसह कलम 3 (मालमत्ता नुकसान प्रतिबंधक) , कलम 7 (अ) (क्रिमिनल लॉ ऍक्ट) या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.



रिपाई नेते गजानन कांबळे यांनी आपला वाढदिवस मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करून साजरा केला असल्याची चर्चा  देखील दबक्या आवाजात घटनास्थळी सुरू होती. 

टिप्पण्या