- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Cricket news: मुश्ताक अली टी - २० स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा; अकोला क्रिकेट क्लबच्या ४ खेळाडूंची निवड
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Vidarbha Cricket Team Announcement for Mushtaq Ali T20 Tournament; Selection of 4 players of Akola Cricket Club
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: कोरोना नंतर प्रथमच देशांतर्गत क्रिकेटला सय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धेला १० ते १९ जानेवारी कालावधीत इंदोर येथे सुरवात होत आहे. स्पर्धेकरिता विदर्भ क्रिकेट संघाची घोषणा झाली आहे. या संघात अकोला क्रिकेट क्लबच्या ४ खेळाडूंची निवड झाली आहे. दर्शन नळकांडे, अथर्व तायडे, आदित्य ठाकरे व मोहित राउत यांचा यात सहभाग आहे.
दर्शन नळकांडे
दर्शन नळकांडे हा मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाजी करणार असून यापूर्वी दर्शन ने १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच १९ वर्षाखालील भारतीय संघाचे इंगलंड येथे प्रतिनिधित्व, रणजी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे तसेच गेल्या दोन वर्षापासून तो किंग्स एलेवन पंजाब संघा कडून आय.पी.एल. स्पर्धेचे प्रतिनिधित्व करित आहे.
अथर्व तायडे
अथर्व तायडे हा सलामीला खेळणारा डावखुरा शैलीदार फलंदाज असून, यापूर्वी त्याने सुद्धा १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले असून अथर्वच्या नेतृत्वात विदर्भ संघ हा १९ वर्षीय स्पर्धेत अजिंक्य राहिला आहे.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे हा मध्यमगती गोलंदाज असून त्याने सुद्धा यापूर्वी १६, १९, २३ वर्षाखालील विदर्भ व मध्य विभाग संघाचे प्रतिनिधित्व तसेच १९ व २३ वर्षाखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच रणजी ट्रॉफी व इराणी ट्रॉफी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड येथे १९ वर्षाखालील झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेचे भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व केले असून, ही स्पर्धा भारताने जिंकली होती.
मोहित राऊत
मोहित राउत हा डावखुरा फिरकी गोलंदाज तसेच शैलीदार फलंदाज असा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी मोहितने २३ वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व व अमरावती विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
"विदर्भ संघ हा Elite Group "D" मध्ये असून, त्याचा सामना गुप मधील राजेस्थान, सौराष्ट्र, मध्ये प्रदेश आणि गोवा या संघासोबत होईल. गेल्या ६-७ वर्षात क्लबच्या खेळाडूंनी अकोला क्रिकेट क्लब, जिल्हा तथा विदर्भाचे नांव राष्ट्रीय तथा आंतराष्ट्रीय स्तरावर नेले आहे. ही बाब अकोला क्रिकेट क्लब व जिल्यातील उदयन्मुख क्रिकेट खेळाडूंसाठी प्रेरणादायी तसेच आत्मविश्वासात भर टाकणारी आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू उरात मोठे स्वप्न घेऊन आत्मविश्वासाने मैदानात उतरतील, असा विश्वास आहे. या चार खेळाडूंची निवड कलब व जिल्ह्यकरिता अभिमास्पद बाब आहे."
-भरत डिक्कर
अकोला क्रिकेट क्लब कर्णधार तथा विदर्भ क्रिकेट संघटना अकोला जिल्हा संयोजक.
क्लब व संघटनेकडून शुभेच्छा
खेळाडूंच्या निवडी बद्दल त्यांचे अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, सहसचिव कैलाश शहा, ऑडीटर दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य ऍड. मुन्ना खान, गोपाळ भिरड, शरद अग्रवाल, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेद अली, परिमल कांबळे, रणजी खेळाडू रवी ठाकूर, सुमेध डोंगरे, अमित माणिकराव, पवन हलवणे, शारिक खान, देवकुमार मुधोळकर, एस.टी. देशपांडे, अभिजीत मोरेकर, किशोर धाबेकर तसेच अकोला क्रिकेट क्लब व जिल्हा हौशी क्रिकेट संघटना अकोलाच्या खेळाडूंनी चौघांचेही अभिनंदन करून स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा