Coronaimpact: नवीन विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध ३१ जानेवारी पर्यंत कायम;तर आंतरराष्ट्रीय विमानांवरही बंदी-मोदी सरकारचा तातडीने निर्णय



भारतीय अलंकार

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना, नवीन कोरोनाचे संकट गंभीर झाल्याने राज्य सरकारने ३१ जानेवारी पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात परिपत्रक राज्य सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. दरम्यान,हाती आलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवावर देखील ३१ जानेवारी पर्यंत मोदी सरकारने बंदी घातली आहे.




कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात लागू करण्यात आलेले निर्बंध मिशन बिगीन अगेन अंतर्गत शिथिल करण्यात आले आहेत. परंतू अजूनही काही निर्बंध कायम आहेत. यामध्ये मुंबईतील लोकल सेवेचा देखील समावेश आहे. पण राज्य सरकारने कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लागू असलेले निर्बंध ३१ जानेवारी पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 




भारतात नवीन कोरोनाचे २० रुग्ण आढळल्या नंतर राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. याआधी घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करत सरकारने अनेक उपक्रमांना परवानगी दिलेली आहे.



आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी


आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारी पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.  करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून या संदर्भातली माहिती दिली आहे. 






टिप्पण्या