Corona update: अकोल्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू; आज ३८ पॉझिटीव्ह रुग्ण




भारतीय अलंकार

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव परत वाढतेय की काय, अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे. मधल्या काळात कोरोनाने वेग कमी केला होता. मात्र, परत कोरोनाने डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. आज ३८ नवे कोरोना रूग्ण आढळले आहे. तर ग्राम भौरद येथील एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडून प्राप्त झाली.



कोरोना अलर्ट

आज मंगळवार १५ डिसेंबर  रोजी सायंकाळी  (सकाळ+सायंकाळ) प्राप्त १११४ अहवाल प्राप्त झाले. यात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या ३८ तर १०७६ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.




आज सायंकाळी  २८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १५ महिला व  १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील पाच, गणेश नगर छोटी उमरी येथील चार, संतोष नगर व आळशी प्लॉट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, उरळ बु., अडोशी, बिर्ला राम मंदिर, जीतापूर खेडकर, रामटेक, जठारपेठ, आपातापा, बिर्ला कॉलनी, काळा मारोतीजवळ, न्यु राधाकिशन प्लॉट, आदर्श कॉलनी, मराठा नगर, गायत्री नगर व मलकापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान, आज खाजगी हॉस्पिटल येथे एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण भौरद, अकोला येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचार दरम्यान मुत्यू झाला. त्याला ११ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.




४५ जणांना डिस्चार्ज 

आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच,  युनिक हॉस्पीटल येथून एक, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ३१ अशा एकूण ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 

सद्यस्थिती


एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ७९३८+१८१३+१७७=९९२८

मयत-३०५

डिस्चार्ज-८९७७

दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-६४६.

...


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 116 चाचण्या, चार पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 116 चाचण्या झाल्या त्यात चार  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे दोन, बार्शीटाकळी येथे 15, तेल्हारा येथे 10, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचारी 37 चाचण्या झाल्या त्यात कुणीही  पॉझिटीव्ह आले नाही. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 46 चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर हेडगेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 157 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1865 पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 



टिप्पण्या