Christmas2020:नाताळाच्या स्वागतासाठी अकोला शहर सज्ज; बाजारपेठत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

City of Akola ready for Christmas reception;  The rush of customers to shop in the market



भारतीय अलंकार
अकोला: ख्रिश्चन धर्मियांचा सर्वात मोठा मानला जाणारा पवित्र सण नाताळ केवळ दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, नाताळाच्या स्वागतासाठी १६० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या विदर्भातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीमधील घरांवर आणि धार्मिक स्थळांवर चर्च सुंदर रोषणाई करण्यात आली आहे.  


नाताळाच्या खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केली. ख्रिश्चन कॉलनीमध्ये आकर्षक आकाशदिवे, रंगबिरंगी विद्युत माळांचा झगमगाट करण्यात आला आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन, ख्रिसमस २५ डिसेंबरला अकोल्यासह जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे. सणानिमित्त सजविण्यात आलेले ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे कपडे, भेटवस्तूंचे सर्वांना आकर्षण असते. पालक लहान मुलांना त्यांच्या आवडीनुसार गिफ्ट देतात. सांताक्लॉजच्या भेटीची लहान मुलांना प्रतीक्षा असते. सध्या कोरोनाची स्थिती असली तरी सर्वात मोठा सण म्हणून ख्रिश्चन बांधवांकडून घरांची रंगरंगोटी, फराळाची व्यवस्था, कपड्यांची खरेदी केली जात आहे. नाताळात गिफ्ट देण्याला महत्व असल्याने गिफ्ट आर्टीकल दुकानात खरेदीसाठी गर्दी झालेली दिसत आहे. 



महानगरात महात्मा गांधी मार्गावर ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदनी, सांताक्लॉजचे शर्ट, टोपी,  ग्रिटींग्ज, कपडे, चॉकलेटस्, केक, कॅटबरी, सजावट साहित्य, विविध रंगाच्या मेणबत्त्या उपलब्ध आहेत. ख्रिसमससाठी बेकरीत विविध फ्लेवर व आकारातील केक, पेस्ट्री सजावटीसह उपलब्ध आहेत. ख्रिश्चन कॉलनी तथा अन्य परिसर दिव्यांनी झगमगत आहे. अकोल्यातील ८ चर्च आणि अकोला जिल्ह्यातील एकूण ३० चर्चमध्ये ख्रिसमस सणाची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या काळात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


शुक्रवार २५ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात प्रभू येशू खिस्तांचा जन्मदिवस खिसमस ( नाताळ) साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त अकोला शहरातील प्रमुख आठ चर्चेस आणि जिल्ह्यातील एकूण ३० चर्चेसमध्ये सकाळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात  आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना चर्चमध्ये प्रवेश असल्याने लाईव्ह स्क्रीमींगच्या माध्यमातून इतरांना या प्रार्थनासभांमध्ये सहभागी होता येणार आहे.


गेल्या नोव्हेंबर महिन्यापासूनच सर्वत्र नाताळ सणाची तयारी सुरु झाली. नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या खिश्चन धर्मियांच्या ग़ृहसणापासूनच खरेतर नाताळाची तयारी सुरु होते. गृहसणाच्यावेळी सर्व खिश्चन कुटूंबे आपापल्या घरांची स्वच्छता करतात. त्या काळात सर्व खिश्चन बधू भगिनी एकमेकांच्या घरी जावून प्रार्थना करतात आणि शुभेच्छा देतात. डिसेंबर महिना उजाडताच घरांना आणि चर्चेसना रंगरंगोटी देण्यास सुरुवात होते. 


पहिल्या पंधरवड्यातच नाताळासाठी कपड्यांची खरेदी,  सणासाठी फराळाची तयारी सुरु होते. २० तारखेलाच सर्च घरे आणि चर्चेसना रोषणाई केली जाते. त्यानंतर सलग चार दिवस घरोघरी फिरुन अबालवृद्ध खिस्तजन्माची गाणी म्हणतात. त्यामध्ये सांताक्लॉजचा वेश परिधान केलेला व्यक्ती सर्व लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. 


२४ डिसेंबरला रात्री १० ते १२ वाजेदरम्यान सर्व चर्चेसमधून प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता फटाके फोडून नाताळाचे जोरदार स्वागत करण्यात येईल.  २५ डिसेंबर रोजी सर्व चर्चेसमधून सकाळी ९ वाजता प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे. 



यावेळी धर्मगुरू बायबल मधील वचनांच्या आधारे खिस्त जन्मावर संदेश देतील. यावेळी संडेस्कुलची लहान मुले खिस्त जन्मावर आधारित नाटिका, गीते, नृत्य सादर करतील. तसेच तरुणसंघ आणि महिला संघाच्या सदस्यांनीही खिस्तजन्माची गीते तयार केली आहेत. यावेळी नव्याने जन्मलेल्या बालकांचे अर्पण करण्याचा विधीही आयोजित करण्यात येतो. त्यानंतर सलग आठ दिवस सर्व चर्चेसमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे खेळ,  यासोबतच बायबल क्वीझ स्पर्धा, सहभोजन, सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. 



अकोला शहरातील अलायन्स मिशन आणि इतर मिशनची असे एकूण ८ चर्चेस असून, नाताळानिमित्त त्या चर्चेसवर सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला पुन्हा रात्री क्यारोल पार्टी घरोघरी जावून नवीन वर्षाच्या स्वागताची गीते सादर करतील. १ जानेवारीला खिश्चन समाज नवीन वर्ष हादेखील सण साजरा करतो. 

टिप्पण्या