Burning car: वणी- वरुळा फाट्याजवळ चालत्या कारने घेतला पेट...




भारतीय अलंकार

अकोट: अकोला रोडवर वणी वारुळा फाट्याजवळ एका इंडिका कारला अचानक आग लागली. ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. या आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही कार कुठली व कुणाची आहे याची माहिती अघाप पर्यंत मिळाली नाही. मात्र, या आगीमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते. 



अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे चालक व हेड कॉन्स्टेबल गोंडचवर हे अकोल्यावरून अकोट कडे जात असताना कार पेटल्या ची माहिती अकोट ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिली. तसेच अग्निशमन दलास पाचारण करण्यास सांगितले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी त्वरीत येवून पेटलेली कार विझवली. परंतू, कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. यावेळी बीट जमादार मनोज कोल्हटकर,पोका बुंदे , गोलोकार, चव्हाण, वैराळे, हासुडे यांच्यासह ग्रामीण पोलीस दाखल झाले होते. विशेष म्हणजे या कारमध्ये कोणीच नव्हते. कारने पेट घेताच कार चालक कागदपत्रे घेवून गायब झाला असल्याचे घटना पाहणारे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. ही कार शेगाव येथील असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास अकोट  ग्रामीण पोलिस करत आहेत.

टिप्पण्या