BJP: रामाचे मंदिर वर्गणीतूनच होणार -आमदार शर्मा



भारतीय अलंकार

‌अकोला: ज्यांना वर्गणी माहीतच नाही. खंडणीवरच ज्यांना विश्वास आहे. त्यांना वर्गणीचे महत्व कसे कळणार? त्यामुळे राम मंदिरासाठी चटकन खंडणी वसूल करून मोकळे व्हावे, असे संजय राऊत यांना वाटणे स्वाभाविक. पण ते राम मंदिर आहे. व्यक्तीची संपत्ती नाही. राम मंदिर लोकवर्गणीतूनच होणार! हे कोट्यावधी हिंदूंची भावना आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केले.




सामना मधून आज संजय राऊत यांनी पुन्हा आपल्या अक्कलचे तारे तोडले आहेत. लोकवर्गणीतून राम मंदिर बांधले जाणे, हे सेनेच्या खासदार संजय राऊत यांना लागणे स्वाभाविक आहे. सत्ता हस्तगत केल्यानंतर सेक्युलर सामनाचे संपादक शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना वारंवार आपल्या आकांना खुश करावेच लागणार ! थोडाही शब्द चुकला की दिल्लीश्वरांकडून फर्मान सुटणार आणि हात रुमालात गुंढाळून, माना झुकवून कुर्निसात करावा लागणार ! त्यातून हा प्रकार राऊत यांनी अग्रलेखातून केला आहे, असाही आरोप आमदार शर्मा यांनी केला. 



राष्ट्रीय अस्मितेचे सर्वोच्च प्रतीक असलेले मर्यादा पुरुषोत्तम, धर्मरक्षक राजा रामचंद्र राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये, असे सेक्युलर वाट वाटणे स्वाभाविक. बरं विकासावर राजकारण झालं पाहिजे हे सांगतात कोण, तर जे स्वतःच विकास कामांमध्ये मोठा अडसर बनले आहेत. स्थगित्यां पलिकडे ज्यांनी काहीच करून दाखवले नाही. ज्यांचा राजकीय प्राणवायू केवळ आणि केवळ भाजपाद्वेष आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेऊन आपली अकार्यक्षमता लपू शकते असे ज्यांना वाटते. ते विकासाच्या गप्पा मारतात हे हास्यास्पद प्रकार असल्याचे आमदार शर्मा म्हणाले.



श्रीरामजन्मभूमीवर राम मंदिर उभे व्हावे म्हणून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातले हिंदू आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आतुर आहेत. धर्मरक्षक राजा राम हा राष्ट्रीय राजकारणाचा विषय होऊ नये, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राऊत यांना वाटते. राऊतच्या  वाटण्याची कोणाला तमा आहे ? श्रीराम हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय नव्हता म्हणूनच तर छद्म धर्मनिरपेक्षता बोकाळली. मतपेटीसाठी अनुनयाचे राजकारण झाले. तुम्ही पहिले इतर राज्यांमध्ये नोटापेक्षा जास्त मते मिळवण्यासाठी  प्रयत्न करा. महाराष्ट्रात जे हाती लागले ते टिकवण्याचा प्रयत्न करा. जनता धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. अजूनही सावरा नाही तर अग्रलेखात उल्लेखिल्या प्रमाणे "हे राम !" म्हणण्याची वेळ आल्यावाचून राहणार नाही. असे असा इशारा भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला.

टिप्पण्या