BJP: राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून भाजपा कार्यकर्त्यांनी सजग राहून कार्य करावे-ना.संजय धोत्रे



अधि.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सध्याच्या राजकीय परिस्थितीचे अवलोकन करून भाजप कार्यकर्त्यांनी सजग राहून कार्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून, सरकारच्या या योजनेचा प्रचार प्रसार करून गेल्या वर्षभरातील ठाकरे  सरकारचे अपयश, जनविरोधी कार्य सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करून आगामी ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाचा झेंडा उंच राहण्यासाठी सज्ज व्हा. जनता जनार्दन भाजपाच्या पाठीशी आहे. भाजपा एकमेव पक्ष आहे की जे कार्यकर्त्यांना चांगल्या कामासाठी दरवर्षी अभ्यास वर्ग आयोजित करून राष्ट्रभक्तीने प्रेरित कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी केले.



स्वर्गीय नामदेवराव पोहरे मराठा मंगल कार्यालय सभागृहात अकोला तालुका  अकोला पूर्व मंडळ अभ्यास वर्गाच्या समारोप प्रसंगी (ऑनलाईन) ते बोलत होते. 



यांची होती प्रमुख उपस्थिती



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, भाजपा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर, तेजराव थोरात, श्रावण इंगळे, किशोर पाटील महापौर अर्चना मसने, सुहासिनी धोत्रे, मंजुषा सावरकर, चंदा शर्मा, अश्विनी हातवळणे, डॉक्टर शंकर वाकोडे, बाळासाहेब आपोतीकर, डॉक्टर किशोर मालोकार, संजय गोडा, अक्षय गंगाखेडकर, माधव मानकर, अंबादास उमाळे, एडवोकेट देवाशीष काकड, सिद्धार्थ शर्मा, महेंद्र कवीश्वर, पंजाबराव आव्हाळे ,अनिल गासे ,जयंत मसने ,अडवोकेट सत्यनारायण जोशी, रामचंद्र उमाळे, राजेश बेले, एडवोकेट सुभाष ठाकूर आदी मंचावर विराजमान होते.




कार्यक्रमाच्या आरंभी उद्घाटक भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, पंडित दीनदयाल उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, संत गाडगेबाबा, गुरू तेग बहादुर सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन व नमन करण्यात आले.



या अभ्यास वर्गामध्ये ४४२ पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी भाग घेतला. अभ्यास वर्ग अकरा तास आठ वेगवेगळ्या विषयावर घेण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रश्नोत्तरीच्या माध्यमातून यामध्ये सक्रिय भाग घेतला. 



अग्नि परीक्षेत पास होणार- आमदार शर्मा 


भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्त्यांची ज्यावेळी अग्नि परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी तो उत्तीर्ण झाला आहे, हा इतिहास आहे. आगामी महानगरपालिकेत अकोल्यातील मतदारांचा जनादेशांचा अपमान करण्याचा प्रकार सुरू आहे. मीडियाचा एक वर्ग जाणीवपूर्वक भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या कामाची प्रसिद्धी देण्याचे ऐवजी नकारात्मक बाबीचा प्रचार होत आहे.  परंतु यापासून सुद्धा भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी सकारात्मक विचार करून कार्यरत असल्याची ही बाब आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगून अग्नि परीक्षेत महानगरपालिकेत ग्रामपंचायत निवडणुकी भाजपा कार्यकर्ता विजय होणाऱ्या सध्याची राजकीय परिस्थिती गंभीर असून, भाजपा विरोधात सगळे पक्ष एकत्रित होऊन मोदी व भाजपा देशाने संघ विचारसरणीचा विरोध करत आहे. राष्ट्रीय विचारसरणीही या विरोधात वेगवेगळ्या कारणाने देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यापासून सावध राहण्याची गरज आहे. भाजपा कार्यकर्ता हा सर्व बाबीचा विचार करत असून, देशातील जनता विशेषता मातृशक्ती भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी असल्याची ही केंद्र सरकारच्या चांगल्या कामाचा व चांगल्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार गोवर्धन शर्मा बोलत होते.



विजय अग्रवाल यांनी घेतला आढावा


यावेळी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी महानगरपालिकेच्या विकास कामाचा व संघटना अहवाल सादर केला.भारतीय जनता पक्ष प्रत्येक बाबीचा चिंतन  करून वाटचाल करीत असल्यामुळे आज देशात भारतीय जनता पक्षाची मुख्यमंत्री पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व विविध पदावर भाजपाचे कार्यकर्ते विराजमान आहे. परंतु कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य ओळखून सामाजिक दायित्व लक्षात घेत ग्रुप संपर्कच्या माध्यमातून जनतेच्या समस्या निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सकारात्मक विचारसरणीचा प्रचार करून केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्ह्यात होणाऱ्या विकास कामाचा आढावा त्यांनी घेतला. 


'मन की बात'करणारी सरकार-आ सावरकर


आमदार रणजित सावरकर यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करेल,असे सांगितले. कार्यकर्ता प्रत्येक बाबीचा व पदाधिकारी प्रत्येक विषयांमध्ये अवगत असणे व सध्याच्या परिस्थितीचे अनुकरण करून आगामी आव्हानाला समर्थपणे पुढे जाण्याची गरज असल्याचेही आमदार सावरकर यांनी सांगितले. चुका लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष वाटचाल करीत असल्यामुळे या विशाल वटवृक्षाला संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे व सामूहिक नेतृत्व ही भारतीय जनता पक्षाची ओळख असून सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष करत आहे त्यांच्या त्या तपस्या बलिदानाने विस्तार होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष देशातील जनतेची समस्या निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक क्षेत्रामध्ये जनतेचे मत जाणून घेऊन 'मन की बात' करणारी सरकार केंद्र सरकार असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.



सोशल मिडियाचे महत्व-सागर फुंडकर

यावेळी सोशल मीडियाचे महत्व व सोशल मीडिया संदर्भात त्याचा वापर या विषयावर सोशल मीडिया मधील अडचणी व आवश्यकता या विषयावर सखोल मार्गदर्शन भाजपा प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक सागर फुंडकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून व सरळ सोप्या भाषेमध्ये सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.


मान्यवरांचे मार्गदर्शन


भाजपाचा इतिहास या विषयावर सिद्धार्थ शर्मा  आपला परिवार आपली विचारसरणी या विषयावर ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांनी विवेचन केले व्यक्तिमत्व विकास या विषयावर पंजाबराव आव्हाडे यांनी प्रकाश टाकला. राष्ट्रीय विचारसरणी या विषयावर एडवोकेट सत्यनारायण जोशी यांनी मार्गदर्शन केले. आत्म निर्भर भारत या विषयी प्राध्यापक अनिल गासे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गिरीश जोशी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत प्रवीण हगवणे, मिलिंद राऊत, अजय शर्मा, शंकर महल्ले, राहुल देशमुख, जान्हवी डोंगरे, कल्पना गावंडे, निकिता देशमुख, अक्षय जोशी, केशव हेडा, प्रशांत अवचार, विठ्ठल चतरकर, हिम्मत देशमुख, मनीराम टाले, संजय गोडफोडे आदींनी  केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी संत गाडगेबाबा व गुरु तेग बहादुर सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त नमन करण्यात आले.

टिप्पण्या