BJP-NCP: राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजनीमा दिलाच पाहिजे;मूर्तिजापुरात भाजयुमोचे निदर्शने



भारतीय अलंकार

अकोला :औरंगाबाद येथील एका शिक्षिकेवर नोकरी देण्याचे आमिष देऊन अतिप्रसंग करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाला असूनही, कारवाई करण्याच्या नावाने बोंब आहे. राज्याचे गृहखाते झोपले आहे का, असा खडा सवाल भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी उपस्थित केला आहे. आज भाजप युवा मोर्चा तर्फे मूर्तिजापूर येथे औरंगाबाद येथील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी सचिन देशमुख बोलत होते.



मूर्तिजापूर येथे खासदार संजय धोत्रे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, मूर्तिजापूर  आमदार हरीष पिंपळे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, युवामोर्चा प्रदेश सचिव व अकोला जिल्हा प्रभारी सोपान कनेरकर यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करत दोषी शिक्षिकेला न्याय मिळावा व आरोपीवर नवीन शक्ती कायद्यानुसार कारवाई करत पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.



यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भाजप तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, शहर अध्यक्ष रितेश सबाजकर, युवामोर्चा तालुका अध्यक्ष पप्पू मुळे,शहर अध्यक्ष हर्षल साबळे, बबलू भेलोंडे, गजानन नाकट, राजू लोंबे,राहुल गुल्हाने, अमित नागवान, राहुल अग्रवाल, निलेश वानखडे, आकाश जाधव, नितीन मुगल, नुपेन अरोरा, राणा सोळंके, लखन अरोरा, ऋषिकेश वारे, आशिष गुंजाळ, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, सुधीर दुबे, ज्ञानेश महामुने व भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपास्थित होते.

टिप्पण्या