Akola Crime:राहुल चौथानी प्रकरण: तत्कालीन ठाणेदार सहित सहा जणांविरुद्ध चौकशीचे आदेश





भारतीय अलंकार

अकोला: पोलिस कोठडी दरम्यान घडलेल्या राहुल चौथानी विषप्राशन प्रकरणी तत्कालीन ठाणेदार उत्तम जाधव यांच्यासह सहा जणांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न भांदवि कलम 307 सहित विविध कलम अंतर्गत चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 


फिर्यादी दौलत चौथानी यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दिली होती की, "त्यांचा मुलगा राहुल चौथानी याला पोलिस कोठडी दरम्यान खदान पोलीस ठाण्यात ११ जानेवारी २०२० विष पाजुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अत्यवस्थ अवस्थतेत राहुलला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले".



या फिर्यादची न्यायालयाने दखल घेवून  तत्कालीन ठाणेदार उत्तम जाधव यांना खदान ठाणे येथून हटवून तपास अधिकारी यांना नोटिस दिली होती. पोलिस कोठडी दरम्यान राहुलला विष देवून जीवे मारण्याचा प्रयत्न व अन्य अनियमितते बाबत दौलत चौथानी यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून सहा विरुद्ध कारवाईची मागणी केली होती.



मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीरता पाहता तत्कालीन ठाणेदार उत्तम जाधव, महिला तपास अधिकारी सुकेशनी जमधाडे, कन्हैया रंगवानी ,कन्हैया आहूजा, जूही आहूजा तथा अंजली आहूजा यांचे विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न 307 सह कलम 166 ,167, 205 ,211, 219, 325 ,328, 330 , 331, 350 ,120 ब भादंवी नुसार चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फिर्यादी तर्फे वकील ऍड वीरेंद्र व्यास आणि ऍड महेंद्र व्यास यांनी काम पाहिले.

टिप्पण्या