Agriculture bill: कृषी कायद्याच्या विरोधात किसान विकास मंच देणार दिल्लीला धडक



भारतीय अलंकार

अकोला: तमाम भारतीय शेतकऱ्यांच्या विकासा करिता व कडाकयाच्या थंडित दिल्लीत जमा झालेल्या लाखो आंदोलन कर्त्यांच्या भेटीकरिता व त्या आंदोलनला पाठिंबा देण्याकरिता नववर्षात १ जानेवारी  रोजी जिल्ह्यातील नागरिक दिल्लीकडे कूच करणार असल्याची माहिती किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.




या केंद्र सरकारने भांडवलदार वर्गांचे हित जोपासण्यासाठी व त्यांना लाभ पोहचविण्यासाठी नवा कृषी कायदा अमलात आणला आहे. हा प्रचलित कृषी कायदा संसदचे अधिवेशन न बोलविता व कास्तकारांना अंधारात  ठेवून अमलात आणून केंद्राने देशभरातील कास्तकारांना कायमचे संपविण्याचा घाट घातला आहे. चार-पाच भांडवलदारांच्या हितासाठी तमाम शेतकऱ्यांना वेठीस धरुन त्या भांडवलदाराचा उपयोग निवडणुकीत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनाचा बळी दिला जात असल्याचा आरोपही यावेळी किसान विकास मंचने केला. 



देश कोरोना सारख्या संकटात सापडला असताना, शेतकरी  विरोधात कायदे करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशभरातील कास्तकार दिल्लीत गोळा होऊन कडाक्याच्या थंडीत बेमुदत आंदोलन करीत आहेत. 

या निरागस कास्तकार बांधवाना पाठिंबा देऊन शेतकऱ्यांचे हित व अधिकार जोपासण्यासाठी तसेच त्या कास्तकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी  आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील कास्तकार व  नागरिक दिल्लीला नेण्याचा किसान विकास मंचचा निर्धार असून, या दौऱ्यात किसान विकास मंच जिल्हावासियांतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.




नवे शेतकरी विरोधी कायदे बिल कास्तकार व कृषी क्षेत्राला आर्थिक कंगाल बनविणारे असून, भांडवलदारांचे हित जोपासणारे व त्यांना आर्थिक लाभ पोहोचविणारे आहे.या कायद्याच्या विरोधात देशभरातील कास्तकार आंदोलन करीत असून, हे काळे बिल रद्द करण्याची मागणी करीत आहेत. दिल्लीतील मैदानात हजारो कास्तकार या थंडीत आरोग्याची पर्वा न करता आंदोलन राबवित असून, केंद्र सरकारच्या या  मनमानीपणाचा विरोध करीत आहेत. देशभरातील या कास्तकारांच्या प्रति कृतज्ञता म्हणून जिल्ह्यातील किसान विकास मंच व कास्तकार वर्ग चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



या नवगठीत मंचला शेतकरी जागर मंचने आपला पाठिंबा घोषित केला आहे. सोमवार १ जानेवारी  रोजी दुपारी २ वाजता  हुतात्मा चौक परिसरात विविध वाहनाद्वारे कास्तकार व सामान्य नागरिक चलो दिल्लीचा नारा देत दिल्लीकडे रवाना होणार आहेत.  दिल्लीमधे अकोला जिल्ह्याचे कास्तकार तेथे सुरु असलेल्या अनिश्चितकालीन किसान आंदोलनात सहभागी होवून किसानप्रती असलेले दायित्व निभावणार आहेत. या चलो दिल्ली किसान आंदोलनात सहभागी होण्यासाठी  नोंदणी प्रारंभ करण्यात आली आहे. किसान विकास मंचच्या या किसान बचाओ दौऱ्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे किसान विकास मंच, गोरक्षण रोड, अकोला येथे सकाळी ९ ते रात्री ७ वा पर्यंत नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 

या पत्रकार परिषदेमधे किसान विकास मंच चे संयोजक विवेक पारसकर, अविनाश देशमुख, समवेत शेतकरी जागर मंचचे जगदीश मुरूमकार, कृष्णा गावंडे, मनोज तायडे, दीपक गावंडे, कृष्णा अंधारे, ज्ञानेश्वर गावंडे, आनंद वानखडे, प्रदीप वखरिया, सागर कावरे, गणेश कळसकर, विलास गोतमारे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या