- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली.
मुंबई: अमेरिकेत जो बायडेन यांच्या विजयानंतर आशियाई शेअर बाजाराला सोमवारी वेग आला आहे.
अमेरिकेत शनिवारी रात्री राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर देखील पडला.
आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजराच्या निर्देशांकाने थेट ६७३ अंकांनी मुसंडी मारली आहे. ४२,५०० पेक्षा जास्त अंकांसह निर्देशांक ऐतिहासिक उच्चांक गाठला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) सुद्धा १८० पेक्षा जास्त अंकांसह १२,४५० च्या पुढे गेला आहे. बँकिंग, वित्तीय सेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ दिसून आली. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झालेली दिसत आहे. शेअर बाजाराला आज गती मिळाल्यामुळे भारतीयांची दिवाळी (Deepawali) देखील तेजीत होण्याचे संकेत मिळाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा