- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अपघात एवढा भयंकर होता की,जागेवरच आजी,आजोबा आणि नातवाचा करुण अंत झाला.
पातूर: येथील साळनीपुरा रहिवासी अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक वय 65 वर्ष ,पत्नी जमीलाबी अब्दुल जब्बार वय 60 वर्ष,नातू मोहम्मद हासिम मोहम्मद साजिद वय 12 वर्ष यांचा आज रविवारी डोणगाव येथे झालेल्याअपघातात मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की, मृतक अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक यांची मुलगी मंगरूळ नवघरे येथे राहते. तिला तिचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तिघे जण हे बजाज एम ए टी दुचाकी क्रमांक एम एच 28 G8435 वर स्वार होवून पातुर कडून मंगरूळ नवघरे येथे जात होते.
दरम्यान, डोणगाव जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या टँकरची धडक लागून त्यांचा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, अपघातात अब्दुल जब्बार अब्दुल रज्जाक ,अब्दुल जमिलाबी अब्दुल जब्बार, मोहम्मद हासीममोहम्मद साजिद यांचा जागेवरच अंत झाला.
ही वार्ता पातुर शहरात वाऱ्या सारखी पसरली. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पातूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तर घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा