RCBafana: सुवर्ण नगरी पोरकी;आर सी बाफना यांचे निधन passed away

जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे


 


भारतीय अलंकार

जळगाव : आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक तथा शाकाहाराचे प्रणेते रतनलाल सी. बाफना यांचे आज दुपारी निधन झाले.मृत्यूसमयी ते ८६ वर्षाचे होते. जळगाव जिल्ह्यासह देशातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी पाच वाजता अहिंसा तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थमुळे बाफना यांच्यावर उपचार सुरू होते. 


जळगावात एक छोटेसे दुकान टाकून सुवर्ण व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवणारे बाफना यांनी विश्वास, सचोटी, पारदर्शकता या बळावर जळगावातील सोने देशभर पोहचविले. एका छोट्या दुकानापासून मोठ्या शोरूमपर्यंतचा प्रवास करणारे बाफना यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून शेकडोंना रोजगार उपलब्ध करून दिला. 


हळूहळू हा व्यवसाय औरंगाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरात बाफना ज्वेलर्सच्या शाखा सुरू केल्या. या सोबतच जळगाव नजीक गोशाळा सुरू बाफना यांनी व्यवसाया सोबत सामाजिक बांधिलकी जपत आर्थिक संकटात असलेल्यांना आधार दिला. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करीत त्यांना आधार दिला. त्यांच्या निधनामुळे सुवर्ण नगरी पोरकी झाली,अश्या भावना सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केल्या.


बाफना यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या परिवारासोबतच सुवर्ण पेढ्यांमधील कर्मचाऱ्यांचाही आधार हरविल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे. व्यवसाय, गोरक्षा अशा कार्यासह बाफना यांनी जैन धर्मियांच्या साधू संत, मुनी यांच्यासाठी निवासस्थान, धर्मशाळा सुरू केल्या.


टिप्पण्या