Politics: बंद लिफाफ्यात दडलंय काय?; १२ नावाचे गुपित उलगडल्या नंतर महाराष्ट्राचे राजकारण काय वळण घेईल?

… हे नावे या बंद लिफाफ्यात असल्याचे कळते. पण राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे.


          राजकारण:गल्ली ते दिल्ली

     ✍️ॲड. नीलिमा शिंगणे-जगड

These names appear to be in this sealed envelope.  But all eyes are now on whether the Governor will approve or block the names of the Mahavikas Aghadi government.




महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. या यादीत एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे या उमेदवारांची नावे असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे. 



राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली.  या संदर्भात संध्याकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या मंत्र्यांनी आपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली.


हे १२ सदस्य कोण ?


भारतीय काँग्रेस: सचिन सावंत - सहकार आणि समाजसेवा, रजनी पाटील - सहकार आणि समाजसेवा, मुजफ्फर हुसैन - समाजसेवा, अनिरुद्ध वणगे - कला


राष्ट्रवादी काँग्रेस: एकनाथ खडसे, राजू शेट्टी- सहकार आणि समाजसेवा, यशपाल भिंगे - साहित्य, आनंद शिंदे - कला


शिवसेना: उर्मिला मातोंडकर - कला, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी 



हे नावे या बंद लिफाफ्यात असल्याचे कळते. पण राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी करणार यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे. कारण, राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या 'पत्रव्यवहार'  आणि अन्य बरेच मुद्द्यावरून झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणे आता औसुक्याचे  ठरणार आहे. 


सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीकडून  या यादीत एकनाथ खडसे यांचे नाव खरंच आहे का, याबाबत राष्ट्रवादीच्या गोटातच  चर्चा सुरु आहे. परंतू,  खडसेंचे नाव निश्चित झाले असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली आहे. पण आता अंतिम टप्प्यात खडसेंचे नाव जाहीर होणार का,हे महत्वाचे ठरणार आहे. कला क्षेत्रातील उर्मिला मातोंडकर, आनंद शिंदे, रेणुका शहाणे आणि शरद पोंक्षे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र बंद लिफाफ्यात ऊर्मिला आणि आनंद शिंदे यांचे नाव असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 



भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याच्या नंतर एकनाथ खडसे यांच्या ऐवजी कन्या रोहिणी खडसे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस कडून पाठवण्यात येणार असल्याच्या चर्चेने खान्देशात जोर धरला होता. मात्र आता ते चर्चेपुरतेच मर्यादित राहिले आहे.





राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये एके ठिकाणी विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरल्याचा सूतोवाच केला होता. मात्र,ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करण्यात येणार असे देखील अनिल देशमुख म्हणाले होते. आता राज्यपाल यांच्याकडे यादी सुपूर्द तर करण्यात आली आहे.पण हे गुपित उलगडल्या नंतर महाराष्ट्राचे राजकारण काय वळण घेईल,हे येत्या काळात दिसून येईल,एवढे मात्र निश्चित.





टिप्पण्या