- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Mission Begin Again: योगा, स्विमिंग पुल, सिनेमा हॉल व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बॅडमिन्टन, टेनीस, स्काश, इनडोअर शुटींग रेन्ज ई., सिनेमा हॉल, थियेटर, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियेटर हे एकूण आसन क्षमतेच्या ५०% मर्यादेत सुरु करता येईल.
भारतीय अलंकार
अकोला: कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार ५ नोव्हेंबर पासून स्वीमींग पूल, योगा संस्था, सर्व प्रकारचे इनडोअर खेळ व चित्रपत्र गृह सुरु करण्याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत गुरुवार ५ नोव्हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन अकोला जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील (Outside the Containment Zone) ५ नोव्हेंबर पासून पुढील नमूद केलेल्या बाबी पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यास याद्वारे परवानगी देत आहे.
स्वीमींग पूल- राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सराव करण्याकरिता (या करिता क्रिडा व युवक कार्य विभाग यांचे कार्यालयाकडून स्वतंत्र मानके निर्गमित करण्यात येतील), योगा संस्था (या करिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे कार्यालयाकडून स्वतंत्र मानके निर्गमित करण्यात येतील) सर्व प्रकारचे इनडोअर स्पोर्टस , जसे बॅडमिन्टन, टेनीस, स्काश, इनडोअर शुटींग रेन्ज ई., सिनेमा हॉल, थियेटर, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियेटर हे एकूण आसन क्षमतेच्या ५०% मर्यादेत सुरु करता येईल. (या करिता सांस्कृतीक कार्य विभाग व स्थानिक प्राधिकरण यांचे कार्यालयाकडून स्वतंत्र मानके निर्गमित करण्यात येतील)
हा आदेश संपूर्ण अकोला शहर व जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहील.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा