Football: जेष्ठ फुटबॉलपटू दिलीप बिसेन यांचे निधन

अकोला फुटबालचा सुवर्ण काळ पाहणाऱ्यां पैकी दिलीप बिसेन एक होते.



अकोला: माजी राष्ट्रीय फुटबॉल व हॉकीपटू दिलीपसिंह बिसेन यांचे आज पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी आहे.



अकोला फुटबालचा सुवर्ण काळ पाहणाऱ्यां पैकी दिलीप बिसेन एक होते. अकोला फुटबॉलला एका वेगळ्या उंची पर्यंत त्यांनी पोहचविले होते. हर दिल अजीज असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. कोणाच्याही मदतीला कधीही धावून जाणे,असा त्यांचा स्वभाव होता. 



फुटबॉलच्या प्रसार व प्रचारासाठी त्यांनी आयुष्यभर वेळ खर्ची घातला. आपला शेती व्यवसाय सांभाळून त्यांनी फुटबॉल प्रेमही जोपासले. अकोल्यातील उच्चस्तरीय फुटबॉल स्पर्धा असो की सामने त्यांचे त्यात तन, मन,धनाने सक्रिय सहभाग असायचा.



त्यांची अंत्ययात्रा कीर्ती नगर येथून निघून मोहता मिल स्मशानभूमी येथे निघाली. त्यांच्या अंतिम यात्रेत  क्रीडा क्षेत्रासह अकोला शहरातील गणमान्य नागरिक सहभागी झालेत. संजय बैस,सतिष भट्ट,संजय पटेकर, गुरुमीत गोसल,जावेद अली आदींनी शोक संवेदना व्यक्त केल्या.त्यांच्या जाण्याने अकोला क्रीडा क्षेत्र पोरकं झाले,अश्या भावना क्रीडा प्रेमींनी व्यक्त केल्या.


टिप्पण्या