Election2020: अमरावती शिक्षक मतदार संघातील बंडखोर नेते शेखर भोयर यांना राष्ट्रवादीतून काढले; जयंत पाटील यांचा आदेश

Shekhar Bhoyar, a rebel leader from Amravati Teachers constituency, expelled from the NCP;  Order of Jayant Patil





भारतीय अलंकार

मुंबई: राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला वेग आला आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. मात्र, अशा धामधुमीत एका उमेदवारावर पक्षातून काढून टाकल्याची कारवाई झाली आहे. 



विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अमरावती येथील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे  चंद्रशेखर (शेखर) भोयर यांची पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे. याबाबतचा सूतोवाच ना जयंत पाटील यांनी शुक्रवारी अकोला येथील भाषणात केला होता. 





महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदार संघाची निवडणूक २०२० साठीची प्रक्रिया ५ नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. त्याचे मतदान १ डिसेंबर रोजी होत आहे. अमरावती शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून श्रीकांत गोविंद देशपांडे वैधरीत्या नामनिर्देशित अधिकृत उमेदवार आहेत. 




चंद्रशेखर उर्फ शेखर भोयर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारा विरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवत आहेत त्यांना नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीने कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाही. त्यांनी केलेले कृती नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी) काँग्रेस पार्टीची शिस्त भंग करणारी असल्याने प्रदेशाध्यक्ष ना जयंतराव पाटील यांचे आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले,अशी माहिती सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

टिप्पण्या