- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021-22 या वर्षात भारताचा जीडीपी 8.8 टक्के असेल असा अंदाज वर्तविला आहे.
अकोला: कोरोना प्रसारामुळे निर्माण झालेल्या स्थितीतून भारताची अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. जीएसटी संकलन, निर्यात वाढ, थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ अशा वेगवेगळया मापदंडातून देशाच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा गती पकडल्याचे दिसते आहे. अर्थव्यवस्थेच्या सध्याचा वेग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट 2024 पर्यंत निश्चित साध्य होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
नामदार धोत्रे म्हणाले की, आर्थिक आघाडीवर सध्या अत्यंत आशादायक चित्र आहे. जून 2020 च्या तिमाहीत जीडीपीची मोठी घसरण नोंदविली गेल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थे विषयी निराशाजनक सूर लावला जात होता. विरोधी पक्षांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात होते.
मात्र त्या काळात अमेरिका, फ्रान्स, सिंगापूर, इंग्लंड, कॅनडा अशा अनेक अर्थव्यवस्थांची गती खुंटल्याचे दिसले होते. गेल्या 2 महिन्यात देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सावरू लागली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, गोल्डमन सॅक्स या सारख्या संस्थांनी भारताची अर्थव्यवस्था 2021-22 मध्ये वेगाने वाढेल.
ऑक्टोबर मध्ये जीएसटी संकलनाने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिरो या प्रख्यात दुचाकी उत्पादक कंपनीने ऑक्टोबर मध्ये 8 लाखाहून अधिक दुचाक्या विकल्या. मागील वर्षीच्या तुलनेत हिरोच्या दुचाकीच्या विक्रीत 16 टक्के वाढ झाली आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीतही लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय या सारख्या बँकांच्या कर्जवितरणात आणि नफ्यात वाढ झाली आहे. मोदी सरकारने गहू आणि तांदळाची हमी भावाने विक्रमी खरेदी केली आहे.
एप्रिल ते ऑगस्ट 2020 या काळात देशात 35.73 बिलियन डॉलर्स एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली. थेट विदेशी गुंतवणूकीत 13 टक्के वाढ झाली आहे. ही स्थिती पाहता 2024 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा निश्चित गाठेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा