- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पण उद्या शहीद भगतसिंहांच्या मार्गाने आंदोलन होईल.
नागपूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी 'शेतकर्यांची दिवाळी 'केंद्रीय मंत्र्यांनीच्या दारी' या आत्मक्लेश आंदोलनाला बुधवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थाना समोर प्रारंभ करण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता.
दरम्यान, नागपूर येथे संविधान चौकात अतिशय शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले.यावेळी झालेल्या ओढाताणीत मंत्र्यांना भेट देण्यासाठी आंदोलकांच्या जवळ असलेले पणत्या, दिवाळी फराळ रस्त्यावर सांडला होता.
यावेळी माध्यमांशी संवाद साधत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपली भूमिका मांडली.
"माझे पोलीस व सरकारला एकच सांगणे आहे की, आज महात्मा गांधीजींच्या शांततेच्या मार्गाने आलो होतो. पण उद्या शहीद भगतसिंहांच्या मार्गाने आंदोलन होईल. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील",अशी चेतावणी तुपकर यांनी दिली.
या आहेत मागण्या
◆ शेतकर्यांना किमान हे. २५ हजार नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज घोषित करावे.
◆ हमीभावाने कापूस खरेदीसाठी तालुकानिहाय CCI चे खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे.
◆ केंद्र सरकारने सोयाबीनचा भाव प्रति क्विं किमान ६ हजार रु भाव स्थिर करण्यासाठी धोरण आखावे.
◆ केंद्र सरकारने पीकविमा कंपन्यांना शेतकर्यांना विमा देण्यासाठी बाध्य करावे.
◆ केंद्राचे नवीन कृषी विधेयक रद्द करावे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा