DIwali2020: ब्राह्मण महासंघ पुरोहित आघाडी तर्फे धनत्रयोदशी व महालक्ष्मी पूजन साठी शास्त्रशुद्ध मुहूर्त जाहीर

पंचांगानुसार धनत्रयोदशी व श्री महालक्ष्मी पूजनाच्या वेळ 

                                       file image




भारतीय अलंकार

अकोला: दिवाळी निम्मित समस्त पुरोहित आघाडीच्या ब्रह्मवृंदांची बैठक आज पार पडली. बैठकीत पंचांगानुसार धनत्रयोदशी व श्री महालक्ष्मी पूजनाच्या वेळा जाहीर करण्यात आल्या. 



त्रयोदशी

                                      fileimage

त्यानुसार त्रयोदशी १३ नोव्हेंबर शुक्रवार सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी ५.५७ वाजेपर्यंत आहे. 



वाहिखाते खरेदी

वहीखाते खरीदी मुहूर्त  १३ ला सकाळी ८ ते ११ लाभ अमृत योग.दुपारी १२:३० ते २:०० शुभ दुपारी ३:३० ते ५:०० उदयोग योग मुहूर्त आहेत.



दीपदान मुहूर्त


सायंकाळी  ५:३० ते ६:०० दीपदान मुहूर्त असून  घराबाहेर यमासाठी दिवा लावून त्याची ज्योत  दक्षिण दिशेकडे करावे व खालील  प्रार्थना करावी. 

"मूत्युनां पाशदण्डाभ्या कालेन शामयासह त्रयोदश्यां दिपदानात्सूर्यज : प्रियतां मम||"




श्रीमहालक्ष्मी पूजन मुहूर्त 

                                       fileimage


शनिवारी १४ नोव्हेंबर 

सायंकाळी: ५:४२ ते ७:४१ वृषभ लग्न 

(लाभ योग) रात्री १२:०८ ते २:१८ सिंह लग्न. 



दिपावली अमावस्या

१४ नोव्हेंबरला दुपारी २:१७ मी. पासुन १५ नोव्हेंबर रविवारला १०:३४ मी. पर्यंत आहे. 


सर्व वेळा या अकोला सूर्योदया नुसार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.


बैठकीला पुरोहित संघाचे अमोल चिंचाळे, समीर अयाचीत, संजय सोनटके, तन्मय अग्निहोत्री ,शशिकांत पांडे , पवन जोशी , नितीन मोहडतकर, बाळू मुळे, सतीश डोंगरे, रघुवीर पाठक, बंडोपंत जोशी, आनंद कुळकर्णी, पवन जोशी,  मुकुंद पर्वते, वैभव धडाधडी व मुळे गुरूजी उपस्थित होते.

टिप्पण्या