- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Diwali temple: मुख्यमंत्री यांनी नागरिकांना दिली दिवाळी भेट; पाडवा पासून मंदिरे उघडणार, हा आदेश नसून श्रींची इच्छा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल.
भारतीय अलंकार
मुंबई: दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रींची इच्छा' असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री यांनी केले नागरिकांना आवाहन
file photo
दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. कोरोनारुपी हा राक्षस हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही,असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरी सारख्या जत्रा संदर्भात शिस्त पाळलीच,असे देखील ठाकरे यांनी सांगितले.
दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थना गृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा.
हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा