- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाडव्याला मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळांसमोर आनंदोत्सव होणार
भारतीय अलंकार
अकोला:गेल्या चार महिन्यापासून मंदिरं उघडण्यासाठी जे आंदोलन आम्ही उभं केलं, या आंदोलनाला अखेर यश आलं. दिवाळीनंतर नियमावली तयार करू , त्यानंतर मंदिरं उघडू असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दिवाळीतच पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याची सदबुद्धी भगवंतानी दिली. हिंदुत्वाचा विजय झाला आणि ठाकरे सरकारचा अहंकार गळून पडाला, असा टोला ज्येष्ठ भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांनी लगावला.
या लढ्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील सर्व साधुसंतांचे आणि भाविक जनतेचे आम्ही अभिनंदन करतो. गेल्या आठ महिन्यांपासून देव आणि भक्तांमध्ये जी दरी तयार झाली होती,ती या पाडव्याच्या मुहूर्तावर आता मिटणार आहे. भक्ताला भागवंताच दर्शन घेता येणार आहे आणि ज्या लाखो कुटुंबाची उपजीविका या मंदिरावर अवलंबून होती, त्यांच्या घरात चूल सुध्दा पेटणार,असे देखील आमदार शर्मा म्हणाले.
पाडव्याला मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळांसमोर मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव सर्व धर्म प्रेमी नागरिकांनी साजरा करावा,असे आवाहन श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा