Devmanus doctor:'देवमाणूस' समजल्या जाणाऱ्या डॉक्टरचे दिव्यांग मुली सोबत गैरवर्तन; रामदासपेठ पोलिसांनी केली डॉक्टरला अटक

पीडीते सोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने या डॉक्टरच्या कानशिलात हाणली. दिव्यांग असलेल्या या मुलीने आपली कशीबशी सुटका करून घेत कॅबिन बाहेर आली.



भारतीय अलंकार

अकोला: डॉक्टर म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप समजल्या जाते. कोरोनाच्या महामारीत जगभर याचा प्रत्यय आला. मात्र, याच वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना अकोला शहरात  घडली. अकोल्यातील एका नामांकित डॉक्टरने रुग्ण मुलीचा विनयभंग  व लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. हा डॉक्टर अनेक सामाजिक संघटनेचा  जबाबदार पदाधिकारी देखील आहे.




खामगाव मधील एका गावात राहणारी मुलगी दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने, आपल्या आई आणि भावा सोबत अकोल्यातील दुर्गा चौकातील नामांकित डॉक्टरकडे उपचारासाठी आली. डॉक्टरने तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला आपल्या कॅबिन मध्ये बोलावून, तपासणी करण्याचा बहाण्याने तिला झोपवले. पीडितेचा आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी हा डॉक्टर आत काय करतो आहे, हे पाहण्याच्या प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरने पीडित मुलीच्या आई व भावाला कॅबिन बाहेर हाकलले. डॉक्टरने पीडीते सोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता, पीडितेने या डॉक्टरच्या कानशिलात हाणली. दिव्यांग असलेल्या या मुलीने डॉक्टरच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करून घेत कॅबिन बाहेर आली. पीडितेने कॅबिनच्या आत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. हा प्रकार ऐकून संतापलेल्या पीडितेच्या भावाने तात्काळ रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.



डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पीडितेने पोलीस स्टेशन गाठल्याने अकोला वैद्यकीय क्षेत्रात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरून एकच  खळबळ उडाली. रामदास पेठ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी रात्री डॉक्टर पुरुषोत्तम तायडे याला रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलीस स्टेशन मध्ये भा दं वि कलम  ३५४, ३७६ C (D) L, ३७७ अन्वये  पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ही कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आव्हाळे, पीएसआय नरेंद्र पद्मने, प्रशांत इंगळे, श्रीकांत पातोंड, विशाल चव्हाण यांनी केली. प्रकरणाचा अधिक तपास रामदास पेठ पोलीस करीत आहेत. प्रकरणातील सत्यता तपासअंती समोर येईलच.पीडिता मनोरुग्ण असून,ती आकसा पोटी आपल्यावर आरोप करीत असल्याचे डॉक्टर तायडे यांचे म्हणणे आहे.




 



टिप्पण्या