Deepawali2020: शिवाजी महाविद्यालयाची वंचितांसाठी सामाजिक दिवाळी; आदिवासी बांधवांचा आनंद करणार द्विगुणित

ही मदत श्री शिवाजी  महाविद्यालयातील  रासेयो स्वयंसेवक जवळ गोळा करायचे आहेत,





अकोला: श्री शिवाजी महाविद्यालय हे डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित असून, या महाविद्यालयाचे सातत्याने सामाजिक उपक्रम सुरू असतात. यावर्षी कोरोना या आजारामुळे सर्व सामाजिक व आर्थिक स्थिती विस्कळीत झालेली आहे. यामध्ये आपल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी बांधव आर्थिक परिस्थितीने जास्त प्रमाणात पीडित आहेत अशांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांच्या संकल्पनेतून यावर्षी सामाजिक दिवाळी साजरी करण्याचे ठरविले आहे. यामध्ये महाविद्यालयातील ह्युमॅनिटी मानव्यविद्या शाखा, वाणिज्य, विज्ञान व गृहविज्ञान,समाजशास्त्र विभाग, राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय, सेवा योजना, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, साथ सेवक फोउंडेशन  तसेच  सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी मिळून सामाजिक दिवाळीचे आयोजन केले आहे. 



यासाठी आपल्याला इतरांच्या आनंदात समाविष्ट होण्यासाठी अल्पशी मदत करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये अशी कितीतरी न वापरलेले किंवा फारच कमी वापरलेले किंवा देण्या घेण्याच्या प्रकारांमधील कपड्यांचे अक्षरशा  ढीग असतात. ज्याचा वापर महिने महिने केल्या जात नाही. परंतू, अशा संकटाच्या काळात आपण याच कपड्यांचा वापर इतरांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नक्की करू शकतो. महाविद्यालयाच्या गृहविज्ञान शाखेकडून मास्क पुरवण्यात येतील. तसेच महाविद्यालयातील प्रत्येक महिला आपल्याकडील न वापरलेली किंवा इतरही प्रकार असलेली किमान एक साडी  आनंद द्विगुणीत करण्याकरता कपडे सुद्धा तसेच पडून असतात,भांडे, शालेय साहित्य चप्पल, शाल ,ब्लॅकेट इत्यादी साहित्य आपण या उपक्रमात देऊ शकता. या उपक्रमात  महाविद्यालयातील अनेक विभाग प्रमुख व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये स्वतःहून पुढाकार घेत आहेत. आपणा सर्वांना सुद्धा अशा प्रकारची संधी उपलब्ध आहे.



इच्छुकांना ही मदत १२ नोव्हेंबर पर्यत  करता येईल. १३ ला सकाळी ८ वाजता  अंजनगाव वरून पाच किलोमीटर अंतरावर असलेले  ' खीरपाणी' नावाचे आदिवासी गाव आहे. या गावांमध्ये आपणाला सामाजिक दिवाळी साजरी करायची आहे व जमा केलेले साहित्य तिथे जाऊन वाटप करायचे आहे.




"सर्व जमा झालेले वस्तू  खीरपाणी गावांमध्ये जाऊन एक छोटेखानी ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन तिथे कोरोना संदर्भात व आरोग्यविषयक मार्गदर्शन करायचे आहे.  सर्वांसोबत आपापला फराळ करून कापडांचे वितरण करायच व सामाजिक दिवाळी साजरी करण्यात येणार आहे."

                      प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे 




"सामाजिक दिवाळी या उपक्रमात मा प्राचार्य,प्राध्यापक  शिक्षक कर्मचारी सोबतच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वतःत आपल्या राहत्या गावात ग  परिसरात फिरून मदत गोळा करत आहे व मोठ्या प्रमाणावर वस्तू जमा झाले आहे उपक्रमाला मा प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे "

                   डॉ संजय तिडके 

       रासेयो अकोला जिल्हा  समन्वयक 




ही मदत श्री शिवाजी महाविद्यालयातील  रासेयो स्वयंसेवक जवळ गोळा करायचे आहेत, असे आवाहन प्राचार्य डॉ रामेश्वर भिसे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अनिल राऊत, आय क्यु ए सी समन्वयक डॉ आशिष राऊत, रासेयो अकोला जिल्हा समनव्यक डॉ संजय तिडके, डॉ आनंद काळे, डॉ गणेश खेकाडे यांनी केले. घरी येऊन सुद्धा मदत स्वीकारण्यात येणार आहे. यासाठी रोहन बुंदेले, हर्षल पाटील, अंकुश इंगळे, सचिन काळे हे घरोघरी जावून मदत स्वीकारणार आहेत.

टिप्पण्या