deepawali2020:यंदाच्या दिवाळीत तयार फराळ व्यापारावर दुहेरी संकट; फक्त ४० टक्के विक्रीची शक्यता

               🎇आली दिवाळी🎆

           ॲड. नीलिमा शिंगणे-जगड



अकोला: घटस्थापनेपासून दिवाळी पर्यंतचा  कालावधी मोठ्या प्रमाणात तयार फराळ खरेदी विक्रीचा काळ असतो. परंतू मागील दोन वर्षे आर्थिक मंदी आणि आता कोरोना विषाणू महामारी अश्या दुहेरी संकटातून तयार फराळ व्यापार उद्योग जात आहे. मागील दोन वर्षापासून सुमारे ५० ते ६० टक्के विक्रीत घट होत आहे. यंदाच्या दिवाळीत तर ३० ते ४० टक्के पण व्यापार होतो की नाही, अशी भीती अकोल्यातील तयार फराळ निर्माते व उद्योजक यांनी भारतीय अलंकार सोबत संवाद साधताना व्यक्त केली.




अलीकडे महिला वर्गाचा कल बाजारातून तयार फराळ आणण्याकडे वाढलेला आहे. म्हणूनच दिवाळी तयार फराळ उद्योग भरभराटीला आला.परंतू यावर्षी कोरोना संसर्गच्या भितीमुळे बाजारातील फराळ आणण्या पेक्षा घरीच फराळ बनविण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे हे एक कारण सुध्दा दिवाळी फराळ व्यापारात घट आणण्याचे महत्वपूर्ण मानल्या जात आहे.



अकोल्यात जवळपास ८० से १०० छोटी मोठी मिठाई आणि नमकीन विक्रीची  दुकाने आहेत. तसेच मोठे ठोक नमकीन मार्केट आहे. दिवाळी निम्मित नमकीन मार्केट मध्ये मोठी उलाढाल होत असते. नवरात्र, दसरा झाला की बाजारात मालाची उचल मोठ्या प्रमाणात होते, यंदा मात्र ठोक विक्री बाजारातही तुटक ग्राहकी सुरू असल्याचे चित्र आहे. 

ग्राहकी नसल्याने येथे दिवाळी फराळ मोजकाच तयार होत आहे. दिवाळी फराळ विक्रेता यांच्या मता नूसार एकूणच बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल कमी झालेली आहे. 




यावर्षी मंदी असल्याने दिवाळी फराळाला कमी मागणी आहे. पूर्वी यासाठी अधिक कारागीरांची गरज लागायची. परंतू यंदा अतिरिक्त कामगार बोलवावे लागले नाही. उलट कमी करावे लागले आहेत. कारागीर कामासाठी विचारपूस करीत असतात पण त्यांनाही काम देता येत नसल्याची खंत फराळ उद्योजकांनी व्यक्त केली.




तर दुसरीकडे तेल, बेसन, शेंगदाणे आदी सर्व वस्तूंचे भाव आभाळाला भिडले आहेत. यामुळे सध्याची बाजाराची अवस्था लक्षात घेऊन विक्रेत्यांनी ४० ते ५० टक्के माल खरेदी करण्यामध्ये कपात केली आहे. यामुळे येत्या दिवाळीत तयार फराळ खरेदी-विक्रीला मोठा फटका बसण्याचे संकेत दिसत आहेत.


"कोरोना संकटामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के व्यापार होण्याची शक्यता आहे."

                         भावेश खिलोसिया,                                 निर्मल उपहार गृह                           सिविल लाइन,अकोला

 

टिप्पण्या