- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ATM अदला बदली वा मदत करण्याचा बहाणा करून अनेकांना त्याने भुलविले. मात्र,अकोला पोलिसांनी असे काही जाळे टाकले की, चोरटा सहज गळाला लागला.
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: लोकांना एटीएम मधून पैसे काढून देतो, असे म्हणत हजारो रुपयांनी लुटणाऱ्या चोरट्यास अकोला पोलिसांनी शिताफीने पकडले. स्थानिक गुन्हे शाखाने ही कार्यवाही केली आहे. हा चोरटा एटीएम अदलाबदली व मदत करण्याचा बहाणा करून पैसे काढण्यात अट्टल असून अनेक गुन्ह्यात तो पोलिसांना 'वॉन्टेड' होता. आतापर्यत अकोल्यात घडलेल्या दोन गुन्हयाची कबुली त्याने दिली. आरोपीला कोर्टात हजर केले असता एक दिवसाचा पीसीआर मिळाला.
सिव्हील लाईन पोलीस येथे कलम ३७९ भा.द.वि प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल असुन, या गुन्हयातील फिर्यादी लहान उमरीत राहणारे ५० वर्षीय शरद शामराव कलोरे हे आहेत.
हकिकत अशी आहे की, १५ फेब्रुवारी रोजी जठारपेठ अकोला येथील एसबीआय एटीएम मध्ये दुपारचे दरम्यान पैसे काढण्या करीता कलोरे गेले होते. एक अनोळखी इसम तेथे येवून कलोरे यांना मदत करण्याचा बहाणा करून कलोरे यांना एटीएम कार्डचा पासवर्ड दाबण्यास सांगितले. यावेळी आरोपीने सुध्दा पासवर्ड पाहून घेतला. कलोरे यांचे एटीएम मधुन पैसे निघाले नाही म्हणुन ते तेथुन परत गेले असता, आरोपीने कलोरे यांच्या ATM पासवार्डचे साहयाने कलोरे यांच्या खात्यामधुन कॅनरा बँकेचे एटीएममधुन २०००० रूपये काढून चोरुन नेले.
कलोरे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला येथे फिर्याद नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
अशा प्रकारचे बरेच गुन्हे अकोला जिल्हयात होत असल्याने या गुन्हयांची उकल करण्याकरीता जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आदेशीत केले. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,अकोला यांचे आदेशान्वये पातुर पोलीस स्टेशनचे सपोनि बायस ठाकुर व स्थागुशा पोउपनि सागर हटवार, पोहवा सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे,पो.कॉ.रफिक शेख, पोकॉ माजीद शेख, पोकॉ एजाज अहेमद,पोकॉ रवि इरचे, सायबर सेलचे पोको गणेश सोनोने, ओम देशमुख व पातुर पो.स्टेचे पोहवा सोहेल खान यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे उद्देशाने गोपनिय माहीती काढुन आरोपी २५ वर्षीय सागर बबन थोरात (रा.बदलापुर ठाणे मुंबई) यास शिताफिने अटक केली. आरोपीने नमुद गुन्हयाची कबुली दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पो.स्टे.पातुर येथील आणखी एका कलम ३७९ भादंविचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
आरोपी कडुन दोन्ही गुन्हयातील एकुण ३१००० रू जप्त करण्यात आले आहे. आरोपीला एक दिवसाचा पीसीआर मिळाला असून, आरोपीस अशा प्रकारचे इतर गुन्हयांबाबत विचारपुस सुरू असुन आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यात आहे
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. बायस ठाकुर, पो उप नि सागर हटवार, पोहवा सदाशिव सुळकर, नितीन ठाकरे, सोहेल खान, पो.का.रफिक शेख, पोको माजीद शेख, पोको एजाज अहेमद, पोकॉ रवि इरचे सायबर सेलचे पोकॉ गणेश सोनोने, ओम देशमुख यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा