Crime news: अकोला पोलिस विशेष पथकाची मोठी कारवाई; मूर्तिजापूरातून केला 10 लाखाचा अवैध गुटखा साठा जप्त

Akola police seize Gutka stocks worth Rs 10 lakh;  Murtijapur had a secret turnover



भारतीय अलंकार

अकोला : मूर्तिजापूर शहर व ग्रामीण परिसरात गुटख्याची छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक व विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार गुटखा माफियांच्या मागावर असलेल्या अकोला पोलिसांच्या विशेष पथकाने आज मोठी कारवाई करीत सुमारे 10 लाखाचा साठा जप्त केला. 



अकोला जिल्ह्यात मोठा गुटखा माफिया सक्रिय असून, याच गुटखा माफियाच्या एका वाहनाच्या चालकाकडून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी मंगळवारी दुपारी सुमारे 4 लाख रुपयांचा गुटख्यासह 10 लाख रुपयांचा साठा जप्त केला. या कारवाई मुळे गुटखा माफियांच्या पाळे मुळाला निश्चितच हादरा बसला असून, लवकरच संपूर्ण टोळी जेरबंद करण्यास पोलिसांना यश येईल,असा विश्वास विलास पाटील यांनी व्यक्त केला.




सविस्तर वृत्त असे की, मूर्तिजापूर शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील एका दुकानातून मोठ्या प्रमाणात गुटख्याची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. 




पथकाने पाळत ठेवून आज एम. एच. 27 बी एक्स 3203 क्रमांकाचे गुटख्याचे वाहन येताच पोलिसांनी छापा टाकून वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता,गुटखाचा मोठा अवैध साठाची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. वाहनाचा चालक विशाल राजेश घोरसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. घोरसले कडून सुमारे 10 लाख रुपयांचा गुटखा साठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या वाहनाच्या चालकाविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




जप्त केलेला माल

अवैध गुटखाने भरलेला माल ज्यात वाह तंबाखू 12 मोठे पोते कीमत 3,88,800 रुपये, तंबाखू पान बहार मोठे 04 पोते कीमत 225000 रुपये व  चारचाकी वाहनाची कीमत  450000 रुपये असा एकूण 10,63,800 रूपयांचा मुद्देमाल जप्त.


टिप्पण्या