BJP Akola:वान धरणातील पाण्यासाठी भाजप उतरले रस्त्यावर; शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग

वान धरणातील पाणी तेल्हारा आणि अकोट तालुका व्यतिरिक्त अन्यत्र आरक्षित करण्यात येवू नये



भारतीय अलंकार

अकोला: तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील भूमिपुत्रांना वरदान ठरणारा वान नदी प्रकल्प धरणातील पाणी पळविण्याचा घाट घातला जात असून, बाळापुर करिता पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. मात्र, वान धरणातील पाणी तेल्हारा आणि अकोट तालुका व्यतिरिक्त अन्यत्र आरक्षित करण्यात येवू नये, या मागणीसाठी भाजपाने आज हिवरखेड येथे संपतराव भोपळे चौकात रास्ता रोको आंदोलन केले. 



वारंवार मागणी करूनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने तेल्हारा तालुका व हिवरखेड भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात व गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील हिवरखेड,शहर येथे  स्व. माजी आमदार देशभक्त संपतराव  भोपळे चौक येथे गुरुवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी  ९ वाजता पासुन रस्ता रोको आंदोलन सुरू आहे.




या रास्ता रोको आंदोलन संदर्भात तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या स्वाक्षरीनिशी तेल्हारा तहसीलदार यांना  १० नोव्हेंबर रोजी एका निवेदन सादर करून सूचित करण्यात आले होते. 

निवेदनाच्या प्रतिलीपी सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा, पोलीस निरीक्षक तेल्हारा, पोलीस निरीक्षक हिवरखेड यांना दिल्या आहेत.शासन केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधीचे कामे करीत असून आमचा घसा कोरडा ठेवून अन्याय  करीत असल्याचे आंदोलकांनी म्हंटले आहे.




गजानन उंबरकार, रमेश दुंतोडे, प्रवीण येउल, बाळासाहेब नेरकर यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. सूलभा दुतोंडे, अनिल कराळे, डॉ संजय शर्मा, पुंजाजी मानकर, किरण सेदानी, अकुश हिवराळे,   पंकज देशमुख, पद्माकर आखरे, रामदास पाटील गावंडे, सुभाष गावंडे, महेद्र भोपळे, रवी मानकर, विनोद धबाले, अकेश पंचबूधे, बजरंग तिडके, वैभव पोटे, संजय भिसे, केशव शेगोंकार, जगतराव पांडे, गजानन राठोड, अशोक सपकाळ, प्रदिप पळसपगार, गंगाधर मोहोड, हरीदास गांवडे, डिगांबर गावडे, मधुकर गांवडे, रामदास गांवडे, सुनिल कारोळे, गजानन भटकर आदी आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती  पंकज टावरी यांनी दिली.




टिप्पण्या