Akola police: हेलमेट सक्ती मोहिमेत ३५० जणांवर दंडात्मक कारवाई

Punitive action against 350 people in helmet enforcement campaign




भारतीय अलंकार

अकोला:  जिल्ह्यात घडणाऱ्या रस्ते अपघातात हकनाक जीव जाणाऱ्यांचा चढता आलेख पाहता शहरा लगतच्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर हेलमेट सक्ती करून , हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून ३५० च्यावर वाहनधारकांवर  दंडात्मक कारवाई करण्यात आली.



१५ दिवसा पासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत , उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह अकोला शहर लगतच्या राष्ट्रीय व राज्य मार्गावर हेल्मेट सक्ती करून,हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवून ३५० चे वर दंडात्मक कारवाई केल्या. 



ही मोहीम राबविण्या मागे दंडात्मक कारवाई करणे हा उद्देश नसून रस्ते अपघातात डोक्याला इजा होऊन होणारे मृत्यू कमी करणे, हा हेतू आहे. दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याची सवय लागावी, हा मुख्य उद्देश असल्याने नागरिकांनी हेल्मेट घालून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.

टिप्पण्या