Akola police: चान्नी परिसरात जुगार अड्डयांवर विशेष पथकाची धाड; ५ जणांना घेतले ताब्यात

Special squad raids gambling dens in Channi area;  5 people were taken into custody




भारतीय अलंकार

अकोला: चान्नी परिसरात आज पोलिस अधीक्षक अकोला यांचे विशेष पथक   अवैध धंद्यांवर कारवाई करणे करिता पेट्रोलिंग करत असताना, नवेगाव आणि  आलेगावं येथील वरली मटका, वरली जुगार अड्डयांवर धाड टाकून, पाच जणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.ही कारवाई पथक प्रमुख विलास पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.



मुद्देमाल जप्त

दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाई मध्ये ग्राम नवेगाव येथून अंकुश दौलत ताजणे (वय २७ वर्ष रा.नवेगाव) यास आणि आलेगाव येथून योगेश वामन तेलगोटे (वय २३ वर्ष),  दशरत उकंडा चिकटे (वय ४७वर्ष), मंगेश तुळशीराम रोटे (वय २६ वर्ष), विनोद श्रीकृष्ण मेसरे (वय २३ वर्ष) यांना ताब्यात घेतले. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाई मध्ये एकूण ३१,६१०/-रुपयेचा मुद्देमाल मिळून आला. सर्व आरोपींच्या विरुद्ध पोलिस स्टेशन चान्नी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 



ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पण्या