Work from home: शेतक-यासाठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्याचे आवाहन हास्यास्पद - राजेंद्र पातोडे

घरात बसवून सरकार चालविण्यासारखा शेती करण्याचा अफलातून सल्ला शेतीची काडीचाही संबंध नसलेली राजकारणीच देवू शकतात.हे आघाडी सरकारच्या प्रमुखांनी सिद्ध केले आहे, असा टोला देखील वंचितने लगावला आहे.






अकोला: शेतक-यांना घरी बसून शेतीची काही कामे करता येतील का अर्थात 'वर्क फ्रॉम होम' साठी कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा आराखडा तयार करावा, असे आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी कृषी संशोधन आणि विकास समितीच्या ऑनलाईन सभेत केले आहे. मुख्ममंत्र्यांचे हे आवाहन शेती आणि शेतक-यांची थट्टा करणारे आणि हास्यास्पद असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र  पातोडे ह्यांनी केली आहे. 




 
शेतक-यांना घरी बसून शेतीची काही कामे करता येतील का अर्थात 'वर्क फ्रॉम होम' साठी कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्याचा आराखडा तयार करावा असे आवाहन काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी डॉ पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या 'कृषी संशोधन आणि विकास समितीच्या २०२०' च्या ४८ व्या ऑनलाईन सभेत केले आहे.मुख्ममंत्र्यांचे हे आवाहन अनाकलनीय असून सरकारच्या शेतकरी विषयक अनास्था व अज्ञानाचे उघड प्रदर्शन करणारे आहे. घरी बसून शेती करणे म्हणजे घरी बसून सरकार चालविण्यासारखे असेल असा काही तरी गैरसमज मुख्यमंत्र्यांना झालेला दिसतो. 


शेतजमिनीची मशागत, पेरणी किंवा लावणी, आंतर मशागत, मळणी, औषध फवारणी, सिंचन, बीजप्रकिया इ. कामे ऑनलाईन कशी करता येतील ? असा प्रश्न असून जगात कुठल्याही देशात नसलेले तंत्रज्ञान विकसित करण्याचा हा अफलातून सल्ला आहे.


मुख्यमंत्र्याना आठ दिवसा पूर्वी त्यांनीच केलेल्या विधानाचा विसर देखील पडलेला दिसतो.शेतक-यांना वर्क फ्रॉम होमचा आराखडा सादर करण्याचे आवाहन करणा-या मुख्यमंत्र्यानी तारखेला " तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो " ह्या मोहिमे संदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला संबोधन केले होते. त्यामध्ये " माझा शेतकरी गरीब आहे, तो वर्क फ्रॉम होम करू शकत नाही" असे विधान केले होते. अवघ्या आठ दिवसातच मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांची गरीबी दूर केलेली दिसते. कारण आठ दिवसाआधी शेतकरी गरीब असल्याने वर्क फ्रॉम होम करू शकत नाही, अशी मांडणी करणारे मुख्यमंत्री आता कृषी संशोधकांनी माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतक-यांसाठी वर्क फ्रॉम होमचा आराखडा मागत आहेत.



हा सर्व प्रकार सरकारची शेती आणि शेतक-या बाबतची अनास्था आणि अज्ञान प्रकट करणारे असून सरकारने असे जादूचे प्रयॊग थांबवून शेतकरी कष्टकरी कसा जगेल, त्याच्या मालाला योग्य भाव कसा मिळेल, अतिवृष्टी, पूर आणि अवकाळीने उध्वस्त झालेला शेतकरी आपल्या पायावर उभे करण्यासाठी जुमलेबाजी न करता भरीव मदत तातडीने त्याचे बँक खात्यात जमा करावी, असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

टिप्पण्या