vegetable sellers: लोणी रस्त्यावरील घाऊक भाजीपाला विक्रेते आंदोलनाच्या पवित्र्यात

नव्या मुख्य भाजी बाजारातील गाळेधारक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार गाळेधारक सहकारी संस्थेच्या वतीने मनपा आयुक्त यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

 the wholesale vegetable sellers 



भारतीय अलंकार
अकोला:  कोविड महामारीत प्रशासनाच्या निर्देशानुसार मुख्य जनता भाजी बाजार मधील घाऊक भाजी विक्रेते लोणी रस्त्यावरील नव्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजारात स्थानांतरित होऊन, तेथे थोक भाजीपाला हर्राशी सुरू  झाली. मात्र, पाच महिने उलटून गेल्यावर जुन्या जनता भाजी बाजारात प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना होलसेल भाजीपालाची हर्राशी केल्या जावून शासनाच्या आदेशाची आणि नियमांची पायमल्ली होत आहे. तसेच ननव्या बाजारातील गाळे धारकांवर अन्याय होत असल्याने हे भाजी विक्रेते आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या संदर्भात निवेदन गाळेधारकांनी मनपा आयुक्त यांना दिले.


लोणी रस्त्यावरील नव्या भाजीपाला बाजारातील भाजीपाला गाळेधारकांवर अन्याय होत आहे. प्रशासनाच्या या नाकर्तेपणा विरोधात नव्या मुख्य भाजी बाजारातील गाळेधारक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार गाळेधारक सहकारी संस्थेच्या वतीने मनपा आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले.


या लोणी रस्त्यावरील नव्या सावित्रीबाईं ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजारची निर्मिती ही दोनशे वीस सदस्य असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतीबा फुले मुख्य बजार गाळेधारक सहकारी संस्थेच्या वतीने प्रशासनाच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. लॉकडाऊन मध्ये महानगरात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना प्रशासनाच्या सूचनेवरून मुख्य जनता भाजी बाजार बंद करून होलसेल हर्राशीचा भाजीपाला व्यवहार लोणी मार्गावरील या बाजारात स्थलांतरित करण्यात आला होता.


या परिसरात अन्य संस्थाही कार्यरत असून ती पण प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत पातूर रस्त्यावरील या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवसाय करीत आहे. मात्र, काही दिवसापासून प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना मूळच्या जनता भाजी बाजारात भाजीपाला हर्राशी मोठ्या प्रमाणात होत असून नागरिक वर्गही त्या ठिकाणी खरेदी करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.


एकीकडे मनपा प्रशासन शहराबाहेर बाजार नेण्यास इच्छूक असून दुसरीकडे जनता बाजारात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून भाजीपाला हर्राशीचा प्रकार नित्य होत आहे. लोणी रस्त्यावरील नव्या मुख्य बाजारात  भाजीपाला विक्रेत्यांनी गाळे घेऊन कर्ज काढून यात पैसे ओतले आहेत. लॉकडाऊन काळात शेतकरी, विक्रेते व नागरिकांची या ठिकाणी अन्य ठिकाणी बाजार नसल्यामुळे रेलचेल होत असे. मात्र, आता जनता बाजारात भाजीपाला हर्राशी
 होत असल्यामुळे या नव्या बाजारातील व्यापारी,विक्रेते व माल पुरविणाऱ्या कास्तकार वर्गावर आर्थिक संकट निर्माण झाले असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


मनपा प्रशासनाने जनता बाजारात भाजीपाला हर्राशीवर प्रतिबंध घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली. अन्यथा मनपा प्रशासन समोर धरणे आंदोलन राबविण्यात येणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली.


संस्थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्यक्ष प्रशांत चिंचोलकार, संचालक गण संतोष अंबरते, गणेश घोसे, अनंत चिंचोलकर, राजेश ढोले, शिवा पल्लाडे, गजानन कातखेडे, योगेश चापके, राजेश ढोमणे, 
अनिल कल्लोरे, सुलभा अंबरते, सौ.गोलाईत समवेत भाजीपाला व्यापारी ओटेधारक व गाळेधारक आदींच्या उपस्थितीत  निवेदन देण्यात आले.



टिप्पण्या