- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बबनराव घोलप यांचा वाढदिवस ,गायत्री बालिकाश्रम वर्धापनदिन आणि वैष्णवी प्रवीण चोपडे यांचा वाढदिवस एकत्रितपणे आज साजरा करण्यात आला.
Babanrao Gholap's birthday celebrated with social activities
अकोला: माजी समाजकल्यान मंत्री तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव उर्फ नानासाहेब घोलप यांचा ६७ वा वाढदिवस , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण चोपडे यांची कन्या वैष्णवी हिचा वाढदिवस,आणि गायत्री बालिकाश्रमचा १० वा वर्धापनदिन असा त्रिवेणी संगम आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अकोला जेष्ठ नागरिक आघाडी व महिला आघाडी यांच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
आज गायत्री बालिकाश्रम मलकापूर अकोला येथील बालकांना नित्यपयोगी वस्तू, अंघोळीचे साबण, कपड्याचा साबण. पावडर, तेल, चॉकलेट, वह्या पुस्तके , बिस्कीट, मिठाई व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग वाडेकर, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भप्रमुख गजानन भटकर, पश्चिम विदर्भ युवाप्रमुख रामाभाऊ उंबरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभा शिरभाते यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा कार्यध्यक्ष प्रवीण चोपडे यांनी केली. आभार प्रदर्शन राज्य कार्यकरणी सदस्य संजोती मांगे यांनी केले.
यावेळी महानगर अध्यक्ष छायाताई इंगळे, शांताबाई वाडेकर ,मंगला चोपडे , रामभाऊ ताजने , के. टी पद्मने , डॉ. प्रभू चापके, प्रा. गणेश बोरकर, महासचिव सुनील गवई, राधेश्याम कळसकर, अविनाश कळसकर ,अजय पदमने , महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, ग्रामीण युवाअध्यक्ष निलेश बोरकर, सुमित पानझडे, संतोष इंगळे. छोटू डांगे , योगेश इंगळे, किशोर काकडे,अक्षय ठोबरे , गणेश काळकर, संदीप कदम, दिनेश दिडुळे, आकाश कळसकर, विष्णू वेरूळ कर, मनोज मालखेळे आदी उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा