- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
श्री विठ्ठल मंदीर आयोजित तेरा लक्ष श्रीराम नाम जपाची पूर्णाहुती सोहळा कोविड-19 नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न
अकोला: जुने शहरातील जागृत श्रीविठ्ठल मंदीर येथे संकल्पीत १३ लक्ष श्रीराम नाम जपाचा पाच दिवसीय संकल्पपूर्ती आहुती सोहळा काटेकोर नियमांचे पालन करून अत्यंत धार्मिक वातावरणात गुरुवारी पार पडला.
शेवटच्या दिवशी या संकल्प सोहळ्याचे मुख्य यजमान ब्रिजमोहन व उषा चितलांगे तसेच गोवर्धन व गंगादेवी शर्मा यांनी पूर्णाहुती हवन करून आहुती श्रीराम चरणी अर्पण केली.
अकोला शहरातील प्रत्येक मंदिरात पुरोहितांनी सामूहिक स्वरूपात, महिला मंडळांनी एकत्रित तसेंच भाविक बंधू माता भगिनींनी आपापल्या घरी वैयक्तिक श्रीराम जप करून या संकल्पपूर्ती साठी आपला सहभाग नोंदवला .
यावेळी मंडळाचे सर्वसेवाधिकारी श्री गोवर्धन शर्मा यांचे हस्ते पाच लक्ष व अधिक जपसंख्या नोंदवणाऱ्या महिला मंडळ व भाविकांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने २ कोटीच्या जवळपास श्रीराम जप अर्पण करणाऱ्या अग्रवाल महिला मंडळ व आशा गोयनका यांची विशेष उपस्थिती होती.
आमदार गोवर्धन शर्मा यांनी संकल्पीत केलेल्या जनकल्याणार्थ व रोगनिवारणार्थ श्रीराम नाम जपास अकोलेकर भाविक बंधू व मातृशक्तीने पूर्णत्वास नेला. येणाऱ्या काळात असाच एक धार्मिक कार्य नियोजन करण्याचा मानस शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
पाच दिवसीय हा कार्यक्रम कोविडचे नियम व सूचनांचे पालन करून, यशस्वीतेसाठी मंडळाचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांचे नेतृत्वात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा